बदली होऊनही साताऱ्यात पोलीस कर्मचारी जागा सोडण्यास ना खुश….


पोलिस अधिक्षकांच्या आदेशाल फासला जातोय हरताळ

(अजित जगताप) :
सातारा पोलीस दलात महाराष्ट्रातील अनेक ठिकाणाहून आलेले पोलीस जवान कार्यरत आहेत. त्यांना कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी विविध ठिकाणी बदलीच्या जागी जावे लागते. परंतु, साताऱ्यात बदली होऊनही पोलीस कर्मचाऱ्यांचा जागा सोडण्यास ना खुश असल्याची बाब उघड झाली आहे.
सातारा पोलीस प्रमुख निखिल पिंगळे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांच्या गैरसोय न करता सोयीने बदल्या केलेल्या आहेत.त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. यामध्ये अनेक पोलिस कर्मचाऱ्यांची प्रशासकीय बदली होऊनहीं पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्याच्या मर्जीने काही कर्मचारी आपली जागा सोडण्यास तयार नाहीत. अशी खाजगीत चर्चा होत असते.
सातारा जिल्ह्यात सहा वर्ष एकाच कार्यक्षेत्रातील पोलीस ठाण्यात कामकाज केल्यानंतर प्रशासकीय बदलीस पोलीस कर्मचारी पात्र ठरतात. अशा पोलीस नाईक, पोलीस हवालदार यांच्या दरवर्षी प्रशासकीय बदल्या नियमाप्रमाणे होतात. यावर्षी देखील कर्तव्यदक्ष सातारा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी या बदल्या कर्मचाऱ्यांच्या सोयीनुसार केलेल्या आहेत . तरीही काही पोलीस कर्मचारी हे पोलिस ठाणे , वाहतूक शाखा, दप्तरी अथवा गुन्हे प्रकटीकरण शाखेत कार्यरत राहून त्याच ठिकाणी सेवानिवृत्ती मिळावी अशी प्रार्थना करत असतात. त्यामुळे बदली झालेल्या ठिकाणी पोलिस हजर होण्यास टाळाटाळ करतात . यामुळे या आस्थापनेवर बदलून आलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना बदलीच्या जागी काम करण्यास संधी मिळत नाही. अशा पोलीस कर्मचाऱ्यांना रिलीव्ह करण्यास पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक देखील तितकेच जबाबदार आहेत.मग, नेमके प्रशासकीय बदली मध्ये हे पोलिस कर्मचारी कशासाठी घेतले ?असा प्रश्न पोलीस कर्मचाऱ्यांमधूनच उपस्थित होत आहे.

——————————————————————— फोटो- फोटो प्रतिनिधिक स्वरूपातील पोलीस कर्मचारी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *