पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे विचार सर्वसामान्यांत रुजवा-प्रा. विशाल गरड

(मुरुम प्रतिनिधी)

मुरूममध्ये अहिल्यादेवी जयंतीनिमित्त लोकव्याख्यान; विचार जागृतीचा संदेश
मुरूम, ता. ४ (प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित लोकव्याख्यानात बोलताना प्रा. विशाल गरड यांनी अहिल्याबाई होळकर यांचे लोककल्याणकारी कार्य, न्यायप्रिय राज्यकारभार आणि समाजहिताचा विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने बुधवार (ता. ३) रोजी अशोक चौक, मुरूम येथे आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख व्याख्याते म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरसेवक राजेंद्र बेंडकाळे होते.
यावेळी शहर भाजप उपाध्यक्ष राजू मुल्ला, नगरसेविका सुनिता बन्ने, प्रदीप बिराजदार, पत्रकार अजिंक्य मुरूमकर, विलास वाडीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. पुढे बोलताना प्रा. गरड म्हणाले, अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनकार्याचा सविस्तर आढावा घेताना जनकल्याणाची कामे, धार्मिक व सामाजिक समतेचा संदेश, न्यायनिष्ठ प्रशासन आणि विकासाभिमुख दृष्टीकोन यामुळे त्या आजही आदर्श शासक म्हणून ओळखल्या जातात. समाजातील प्रत्येक घटकाच्या उन्नतीसाठी कार्य करणाऱ्या अहिल्यादेवींच्या विचारांचे अनुकरण करून समाजहिताची भावना जोपासण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष बिरू ढंगापुरे, उपाध्यक्ष मारुती बन्ने, सचिव राहुल बन्ने यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. समितीचे मार्गदर्शक दिगंबर सोनटक्के, विजय घोडके यांनी कार्यक्रमाच्या नियोजनासाठी विशेष मार्गदर्शन केले. म्हाळू ढंगापुरे, दयापूरे, सचिन ढंगापुरे, संदीप ढंगापुरे, शांतू बन्ने, सागर कांबळे, रतन बन्ने, राजू दुधभाते, गंगाधर दुधभाते, रामदास बन्ने, बंडू बन्ने, सचिन गाडेकर, आकाश गाडेकर, दीपक सोनटक्के, सुचिन सुरवसे, राम चेंडके व बरगली चेंडके आदींनी विशेष परिश्रम घेतले. या प्रसंगी उपस्थितांनी प्रा. विशाल गरड यांच्या अभ्यासपूर्ण व प्रेरणादायी व्याख्यानाचे कौतुक केले. अहिल्याबाई होळकर यांच्या विचारांचा प्रसार समाजात व्यापक प्रमाणात व्हावा आणि नव्या पिढीला त्यांच्या कार्यातून प्रेरणा मिळावी, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार प्रवीण राठोड यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *