म्हसवड (वृत्तसेवा)म्हसवड येथील माण नदीच्या पुलाखाली मृत्य अवस्थेत आढळलेल्या अज्ञात व्यक्तीचा शोध लागला असून सदरची व्यक्ती दिघंची तालुका आटपाडी जिल्हा सांगली येथील असल्याचे निष्पन्न झालेले आहे.सदर व्यक्तीचे नाव रामचंद्र नामदेव रणदिवे असे असून ही व्यक्ती म्हसवड येथील माण नदीत पुलाखाली बसले असताना अचानक त्यांना हृदयविकरचा झटका आला व त्यामध्येच त्यांचे निधन झाले असे पोलिसांनी सांगितलेले आहे.अधिक माहिती अशी,सातारा पंढरपूर रस्त्यावरील माण नदी पुलाखाली एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला होता.म्हसवड पोलिसांनी याबाबत दोन दिवसापूर्वी अज्ञात व्यक्तीचा मृत्यू अशा आशयाखाली माहिती सोशल मीडियावर प्रसारित केलेली होती.या सोशल मीडियाच्या माहितीवरून मयताचे पुतण्या व त्यांची बहीण व इतर नातेवाईकांना ही माहिती सोशल मीडियावरून समजल्यानंतर त्यांनी म्हसवड पोलीस स्टेशन येथे समक्ष मयताची पाहणी करून सदरचा मृत्यू झालेला व्यक्ती हा आटपाडी तालुक्यातील दिघंची येथील रामचंद्र नामदेव रणदिवे असल्याचे निष्पन्न झालेले आहे.मताची बहीण ललिता महादेव खिलारे दहिगाव, जिल्हा सोलापूर यांनी याबाबत पुष्टी दिली असून मयताचे नातेवाईक नाना सोमनाथ रणदिवे यांनी याबाबत सदर व्यक्तीची ओळख पटवून पोलिसांना सविस्तर माहिती दिलीआहे.यामुळे पोलिसांनी या मयताचा शोध लावलेला आहे. पोलीस निरीक्षक संदीप पोमण यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले….. Post navigation म्हसवड पोलिसांची हातभट्टी दारू निर्मितीवर धडक कारवाई; १८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त हॉटेल नानाजसमोरून प्लेटिना दुचाकी लंपास