म्हसवड प्रतिनिधी
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर , महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज या महापुरुषांनी समतेचा ,शांततेचा शिक्षणाचा जागर केला आजच्या तरुणांनी या महापुरुषांना अभिप्रित असलेल्या विचाराचा जागर जयंती उत्सवात व्हावा असे आवाहन म्हसवड पोलीस ठाण्याचे प्रभारी सपोनि दत्तात्रय दराडे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित बैठकीत करुन दराडे पुढे म्हणाले मिरवणुकीला गालबोट लागेल असे कृत्य खपवून घेणार नाही मग त्याठिकाणी कोणी ही असो त्याची गत केली जाणार नाही.
असे सपोनि दराडे म्हणाले
म्हसवड पोलिस ठाण्यात म्हसवड परिसरातील विविध गावांतील गावातील जयंती मंडळाचे पदाधिकारी यांची बैठक घेण्यात आली यावेळी म्हसवड, देवापुर,भालवडी,पळशी,वळई , वडजल, हिंगणीआदी गावांतील प्रमुखांची बैठक घेऊन त्यांच्या अडचणी समजून घेत , जयंती कार्यक्रमात वा मिरवणूकीच्या दरम्यान दारू पिऊन,गोंधळ ,वादा वादी करुन या उत्सवाला गालबोट लागेल असे कोणी करण्याचा प्रयत्न केल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा म्हसवड पोलीस ठाण्याचे प्रभारी सपोनि दत्तात्रय दराडे यांनी दिला
यावेळी पोलीस हवालदार इंदलकर,
कुमार सरतापे,अंगुली बनसोडे एल के सरतापे ,विकास सरतापे अध्यक्ष सारंग लोंढे उपाध्यक्ष बंडा सरतापे, निलेश सरतापे, योगेश सरतापे,आनंद धाईजे , विरेंद्र वाघमारे, युवराज सरतापे, आलोक सरतापे,अभय सरतापे, अंकुश फुटाणकर आदी उपस्थित होते
