म्हसवड (वार्ताहर )—-

माण तालुक्यातील म्हसवड शहरालगत धुळदेव गावच्या हद्दीत आज सकाळी भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून अन्य तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने सातारा येथील डॉ. क्रांतिसिंह रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, सातारा (कोडोली) येथील निकम कुटुंब देवदर्शनासाठी पंढरपूरकडे आल्टो कारने निघाले होते. सकाळी ९ नंतर म्हसवडहून पुढे जात असताना धुळदेव गावाजवळ रस्ता उखडलेला असल्याने चालकाचा अंदाज चुकला. अचानक ब्रेक लावल्याने कारने तीन ते चार पलट्या घेतल्या. या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले.

घटनेची माहिती मिळताच धुळदेव ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढले व म्हसवड पोलिसांना कळवले. पोलिस कर्मचारी अभिजीत भादुले, लुबाळ व हांगे यांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून ग्रामस्थांच्या मदतीने १०८ रुग्णवाहिकेद्वारे जखमींना म्हसवड येथील संचित रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी सातारा येथे हलविण्यात आले.

दरम्यान, या अपघातानंतर धुळदेव ग्रामस्थ संतप्त झाले असून या दुर्घटनेस प्रशासनालाच जबाबदार धरले जात आहे. सातारा–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील धुळदेव परिसरातील रस्त्याचे काम मागील आठ वर्षांपासून रखडलेले आहे. यासाठी ग्रामस्थांनी वारंवार आंदोलने करूनही प्रशासनाकडून ठोस कार्यवाही झालेली नाही.

या ठिकाणी आतापर्यंत सुमारे २० जणांचा मृत्यू झाला असून ३०० हून अधिक लहान-मोठे अपघात घडले आहेत. आणखी किती बळी गेल्यानंतर प्रशासनाला जाग येणार, असा संतप्त सवाल धुळदेव ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या:
“निर्भया पथकाला बालविवाह रोखण्यात यश; अल्पवयीन मुलीला मिळाले नवजीवन”    |    वडूजच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी; सहा महिन्यांत महत्त्वाची विकासकामे मार्गी – नगराध्यक्ष स्वप्नाली गोडसे    |    हिंगणी ग्रामपंचायत कार्यालयाला ग्रामस्थांनी ठोकले टाळे; ग्रामीण मार्ग क्र. १४४ च्या प्रश्नावरून संताप    |    आजचे राशीभविष्य.. 1 जून 2026..    |    म्हसवड येथील नगरवाचनालयात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती उत्साहात साजरी    |    म्हसवड पोलीसांचा दारु भट्टी वर छापा..    |    स्वच्छ बस स्थानक स्पर्धेत म्हसवड पुणे विभागात द्वितीय    |    आपली साथ आणि आशीर्वाद द्या- राजा माने    |    माणदेशी न्यूज - ताज्या घडामोडींसाठी वाचत रहा!