प्रतिनिधी म्हसवड

म्हसवड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला हवालदाराने जप्त वाहन सोडवून देण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) कारवाई करत संबंधित हवालदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
निता नारायण पळे (बॅ. नं. १७९६), रा. क्रांतीसूर्यनगर, म्हसवड, असे संशयित आरोपी महिला हवालदाराचे नाव आहे.

तक्रारदार यांच्याविरुद्ध म्हसवड पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये
२ जानेवारी २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्यात तक्रारदार यांची ओम्नी कार (एम.एच. ४५ एन ६७२९) जप्त करण्यात आली होती. हे वाहन सोडवून देण्यासाठी मदत करते, असे सांगून पोलीस हवालदार निता पळे यांनी तक्रारदाराकडे पाच हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सातारा येथे करण्यात आली होती.

या तक्रारीच्या अनुषंगाने दि. ७जानेवारी २०२६ रोजी एसीबीने पडताळणी करून सापळा रचून कारवाई केली. पडताळणी व सापळा कारवाई दरम्यान पंचासमक्ष तक्रारदाराकडे पाच हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याने संशयित आरोपी महिला पोलीस हवालदार निता पळे यांच्याविरुद्ध म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. तपास अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक सुप्रिया गावडे काम
आहे. या कारवाईचे पर्यवेक्षण पोलीस उप-अधीक्षक राजेश वसंत वाघमारे यांनी केले.
मार्गदर्शन पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे व अपर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले (लाप्रवि, पुणे परिक्षेत्र) यांनी केले. दरम्यान, सातारा जिल्ह्यातील तसेच इतर जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, कोणत्याही कामासाठी लाच मागितल्यास किंवा खासगी व्यक्तीमार्फत लाच मागितली तर लोकसेवकाने तत्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या:
“निर्भया पथकाला बालविवाह रोखण्यात यश; अल्पवयीन मुलीला मिळाले नवजीवन”    |    वडूजच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी; सहा महिन्यांत महत्त्वाची विकासकामे मार्गी – नगराध्यक्ष स्वप्नाली गोडसे    |    हिंगणी ग्रामपंचायत कार्यालयाला ग्रामस्थांनी ठोकले टाळे; ग्रामीण मार्ग क्र. १४४ च्या प्रश्नावरून संताप    |    आजचे राशीभविष्य.. 1 जून 2026..    |    म्हसवड येथील नगरवाचनालयात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती उत्साहात साजरी    |    म्हसवड पोलीसांचा दारु भट्टी वर छापा..    |    स्वच्छ बस स्थानक स्पर्धेत म्हसवड पुणे विभागात द्वितीय    |    आपली साथ आणि आशीर्वाद द्या- राजा माने    |    माणदेशी न्यूज - ताज्या घडामोडींसाठी वाचत रहा!