.. माण तालुक्यात म्हसवड पोलिसांची मोठी कारवाई; वरकुटे-मलवडी येथे हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा, १७,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त म्हसवड:माण तालुक्यातील वरकुटे-मलवडी गावच्या हद्दीत खरातवाडी तलावाच्या खालील बाजूला बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या हातभट्टी दारू निर्मितीच्या अड्ड्यावर म्हसवड पोलिसांनी गुरुवारी (दि. ९ जुलै २०२६) दुपारी धाड टाकली. या कारवाईत पोलिसांनी एकूण १७ हजार ५०० रुपये किमतीची हातभट्टीची दारू आणि दारू तयार करण्याचे रसायन जप्त केले असून, एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.याप्रप्रकरणी अजित संजय माने (वय २९, रा. शिरताव, ता. माण, जि. सातारा) याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तलावाच्या बाजूला सुरू होती दारूची निर्मिती पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, म्हसवड पोलीस ठाण्यापासून दक्षिणेला १६ किलोमीटर अंतरावर असलेल्या वरकुटे-मलवडी गावच्या हद्दीतील खरातवाडी तलावाच्या खालील बाजूला बेकायदेशीररीत्या हातभट्टीची दारू तयार केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी आरोपी अजित माने हा हा दारूचा अड्डा चालवत होता. ९ जुलै रोजी दुपारी १:४५ वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला. १७,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त या छाप्यात पोलिसांनी खालील मुद्देमाल जप्त केला आणि रसायनाचा साठा जागेवरच नष्ट केला: हातभट्टी दारू: एका निळ्या रंगाच्या प्लास्टिक बॅरलमध्ये असलेली सुमारे ३० लीटर काढीव हातभट्टी दारू (किंमत अंदाजे १,५०० रुपये). दारूचे रसायन: तीन लोखंडी आणि एका हिरव्या रंगाच्या प्लास्टिक बॅरलमध्ये भरलेले एकूण ८०० लीटर आंबट-गुळचट वासाचे रसायन (किंमत अंदाजे १६,००० रुपये). नमुने: रासायनिक विश्लेषणासाठी (C.A. Sample) दारू आणि रसायनाचे नमुने काचेच्या बाटलीत जप्त करण्यात आले आहेत. आरोपीला BNSS अंतर्गत नोटीस या कारवाईनंतर म्हसवड पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल अनिल विलास वाघमोडे (बक्कल नंबर १४५१) यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली. त्यानुसार आरोपी अजित संजय माने याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (क)(ड)(ई) प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपीला BNSS ३५(३) प्रमाणे कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. वरिष्ठांचे मार्गदर्शन आणि तपास सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आणि वडूज विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी (DYSP) यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक (A.PI) पोमण यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. सध्या या परिसरातील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवादार लुबाळ (ब.नं. १६७७) करत आहेत.या कारवाईमुळे माण तालुक्यातील अवैध दारू धंदे चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. Post navigation रिपब्लिकन सेनेच्या जिल्हाध्यक्षांचा अभिमान : रमेश उबाळे विधवा आणि विशेष परिस्थितीतील महिलांचे पुनर्विवाह समाजाने सकारात्मक दृष्टीने स्वीकारणे ही काळाची गरज आहे – सत्यशोधक रघुनाथ ढोक