नाझरे प्रतिनिधी
वझरे ता. सांगोला येथील सुमारे 300 विद्यार्थी शालेय शिक्षण घेत असून, सध्या रात्रीची लाईट नसल्याने शैक्षणिक नुकसान होत आहे व ग्रामीण भागातून बहुतेक सर्व शेतकरी विद्यार्थी शेतीच्या कामानिमित्त गावाबरोबर, वाडी वस्तीवर मोठ्या संख्येने राहतात, याबरोबर जमीन जुमला, जनावरे पाळलेले असतात त्यांची देखभाल करणे, दूध, चारा, पाण्यासाठी वाढीवस्तीवरच रहिवास करतात व त्यांची शाळेत शिकणारी मुले ही राहतात परंतु सुमारे दोन महिने झाले संध्याकाळी ची वीज मिळत नाही व या अनियमित वीज पुरवठ्यामुळे विद्यार्थ्यांचे, नागरिकांचे, लहान बालकांचे व वयोवृद्ध नागरिकांचे हाल प्रचंड होत आहे व यामुळे वझरे ग्रामस्थांनी ग्रामसभेचा ठराव घेऊन सांगोल्याचे लोकप्रिय आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख व महावितरण कार्यालय नाझरे कार्यालयात भेट देऊन दिला आहे.
सध्या वझरे विद्युत उपकेंद्राचे काम संथ गतीने सुरू असून, कंपाउंड भिंत व आतील सिमेंट कॉलम उभे केले व चौकोनी चबुतरा तयार झाला परंतु यावर पाणी न मारल्याने बांधकाम पांढरे पडले असून ते निकृष्ट दर्जाचे होत आहे कारण पाणी मारण्याची व्यवस्था नाही व याकडे संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे व थोडाफार उभा केलेला डांगोरा कोसळेल असे नागरिकात बोलले जात आहे मग यास जबाबदार कोण तरी पाण्यासाठी स्वतंत्र बोर घेऊन संबंधित बांधकाम ठिकाणी दिवसातून तीन वेळा पाणी मारावे अशी नागरिकांची मागणी आहे. व गावाने विद्युत उपकेंद्रास जागा दिली हे लक्षात घेता, उपकेंद्रास दिवस रात्र लाईट आहे व गावाला नाही तर अगोदर गावात विद्युत पुरवठा सुरू करा व येत्या 15 ते 20 दिवसात विद्युत पुरवठा सुरू करा अन्यथा वजरे ग्रामस्थ विद्यार्थ्यासह आंदोलनाच्या तयारीत आहेत.
______________
वझरे ता. सांगोला येथील ग्रामस्थ, विद्यार्थी, शेतकरी व अबाल.. वृद्ध यांची अडचण लक्षात घेता, गाव व वाड्या वस्त्या भगीरथ मध्ये करून विजेची अडचण दूर करा अशा सूचना आपण हातीद व नाझरे महावितरण अभियंतास दिलेल्या आहेत व लवकरच यावर मार्ग निघेल.
आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *