म्हसवडमध्ये अज्ञात चोरट्याचा धुमाकूळ; ५० हजारांची दुचाकी चोरी. 4 तासात चोर गजाआड. पार्किंग केलेली मोटारसायकल तासाभरात गायब; पोलिसांत गुन्हा दाखल म्हसवड / प्रतिनिधीशहरातील हॉटेल नानाजसमोर पार्क केलेली प्लेटिना दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना घडली असून याप्रकरणी म्हसवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी काही तासांतच आरोपी मुद्देमालासह अटक करण्यात आली.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशांत सुरेश देवकते (वय 23, रा. काळमवाडी, ता. माळशिरस, जि. सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे. दिनांक 12 जून 2026 रोजी सायंकाळी 6 ते 7 वाजण्याच्या दरम्यान म्हसवड येथील हॉटेल नानाजसमोर पार्क केलेली त्यांचे मित्र संतोष महादेव सूळ यांच्या मालकीची बजाज कंपनीची काळ्या रंगाची प्लेटिना मोटारसायकल (क्र. MH 45 U 5655) अज्ञात चोरट्याने चोरून नेली.चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 50 हजार रुपये असून, या प्रकरणी म्हसवड पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक 164/2026 भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 303(2) अन्वये दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार कुंभार करीत असून पोलिसांनी काही तासांतच आरोपी मुद्देमालासह केला आहे.. याप्रकरणी किशोर शहाजी चव्हाण राहणार हिंगणी यास अटक करण्यात आली आहे … Post navigation अज्ञात मृत व्यक्तीची अखेर ओळख पटली.दिघंची येथील रामचंद्र रणदिवे असल्याचे निष्पन्न. माण तालुक्यात म्हसवड पोलिसांची मोठी कारवाई; वरकुटे-मलवडी येथे हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा, १७,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त