वडूज वार्ताहर

वडूज येथील वडूज शिक्षण विकास मंडळ वडूज संचलित नेहमी नाविण्याचा ध्यास असणाऱ्या महात्मा जोतिबा फुले पूर्व प्राथमिक व प्राथमिक शाळेच्या वतीने पालकांच्या सहकार्यातून नवोपक्रम बालक-पालक सहलीचे आयोजन करण्यात आले होते.
बालक-पालक सहल उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.
या सहलीमध्ये नर्सरी, लहान गट व मोठा गट या वर्गातील विद्यार्थी सहभागी झाले होते. सहलीत एकूण 40 पालक, ४९ मुले, 4 शिक्षिका व १ शिपाई यांनी सहभाग घेतला होता. सहलीमुळे मुलांना निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवण्याची तसेच पालकांसोबत आनंददायी क्षण अनुभवण्याची संधी मिळाली.
ही सहल वडूज – नृसिंहवाडी- चिकूची वाडी (कोल्हापूर )- खिद्रापूर – वडूज या रूटने नेण्यात आली. नृसिंह वाडी येथे तीन नद्यांच्या संगमावर वसलेले दत्तमंदिर पाहण्यात आले. मंदिराचा परिसर अतिशय स्वच्छ, सुंदर व प्रसन्न असल्याने सर्वांनी तेथे काही वेळ घालवत शांत वातावरणाचा अनुभव घेतला.
त्यानंतर पोमाने रिसॉर्ट येथे मुलांसाठी विविध खेळ व मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. मुलांनी तसेच पालकांनी देखील या खेळांमध्ये सहभागी होत मनसोक्त आनंद लुटला. तसेच मुलांना स्वीट कॉर्न खाण्याचा आनंदही घेता आला.
दुपारच्या जेवणात चपाती, भाकरी, मसालेदार वांगे, गुळाचा खीर, गुलाबजाम आदी विविध स्वादिष्ट पदार्थांचा समावेश होता. मुलांनी व पालकांनी या जेवणाचा आस्वाद घेतला.
यानंतर चिमुकल्यांनी खिद्रापूर येथील स्वयंभु महादेव मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले.
दिवसभर आनंद, खेळ व आईच्या सहवासाने आणि प्रिय वर्ग
शिक्षिकांच्या सोबत ही सहल सर्वचं चिमुकल्यांसाठी अविस्मरणीय ठरली.
या सहलीमुळे मुलांना निसर्ग, पर्यटन स्थळे व सामाजिक सहवास यांची माहिती मिळाली. तसेच मुलांमध्ये आनंद, उत्साह व एकोप्याची भावना वाढीस लागली.
ही सहल यशस्वी करण्यासाठी वडूज शिक्षण विकास मंडळ, वडूजचे सन्मा.संचालक मंडळ, मुख्याध्यापिका शितल शिंदे, सहल विभाग प्रमुख अशितोष गवळी,बालवाडी विभाग प्रमुख सुवर्णा लोहार, सहाय्यक शिक्षिका मनीषा खाडे, संज्योती पवार, सुजाता जाधव शिक्षकेतर कर्मचारी राणी पाटोळे व सर्वच पालकांनी मोलाचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या:
“निर्भया पथकाला बालविवाह रोखण्यात यश; अल्पवयीन मुलीला मिळाले नवजीवन”    |    वडूजच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी; सहा महिन्यांत महत्त्वाची विकासकामे मार्गी – नगराध्यक्ष स्वप्नाली गोडसे    |    हिंगणी ग्रामपंचायत कार्यालयाला ग्रामस्थांनी ठोकले टाळे; ग्रामीण मार्ग क्र. १४४ च्या प्रश्नावरून संताप    |    आजचे राशीभविष्य.. 1 जून 2026..    |    म्हसवड येथील नगरवाचनालयात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती उत्साहात साजरी    |    म्हसवड पोलीसांचा दारु भट्टी वर छापा..    |    स्वच्छ बस स्थानक स्पर्धेत म्हसवड पुणे विभागात द्वितीय    |    आपली साथ आणि आशीर्वाद द्या- राजा माने    |    माणदेशी न्यूज - ताज्या घडामोडींसाठी वाचत रहा!