स्वयं सिद्धा सौ. समिंद्रा ताई जाधव…… – सौ . राजश्री पाटील (शब्दांकन- श्री अजित जगताप सायगाव)

ग्रामीण भागामध्ये युवती- महिला यांना कोणत्याही क्षेत्रात काम करत असताना सामाजिक- कौटुंबिक आचारसंहितेचे पालन करावे लागते. यामध्ये संस्काराचा भाग असला तरी काही वेळेला प्रत्येक क्षेत्रामध्ये गरुड झेप मारताना स्वतःची गुणवत्ता सिद्ध करावी लागते. त्या अर्थाने छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जावळी तालुक्यातील येरूणकरवाडी ते भणंग आणि पुढे सामाजिक कार्यातून मिळालेल्या पुरस्कारासाठी परदेश गमन करणाऱ्या सौ . समिंद्राताई जाधव यांचा आता नावलौकिक महाराष्ट्रभर पोहोचला आहे. आदरणीय ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार साहेब, राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब, खासदार सुप्रियाताई सुळे सौ . वैशालीताई शशिकांत शिंदे अशा मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेश कार्यकारणी मध्ये त्या सध्या कार्यरत आहेत. याचबरोबर या राजकीय प्रवासामध्ये २००८ मध्ये स्वयंसिद्धां महिला विकास संस्थेची स्थापना केली.
सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी त्यांनी अनेक विधेयक उपक्रम राबवले. प्रत्येक प्रगतीचा मार्ग हा शैक्षणिक क्रांतीतून घडत असतो. त्याची जाणीव ठेवून त्यांनी जावळी तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये गोरगरीब कष्टकरी शेतकरी शेतमजूर यांच्या मुलांसाठी शैक्षणिक साहित्य सोबतच अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सिंहाचा वाटा उचलला होता. संस्थेच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवत आहेत.
आदरणीय सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक बापू जाधव व मुलांची त्यांना भक्कम साथ असल्यामुळे सौ . समिंद्रा ताई जाधव यांनी राजकीय व सामाजिक क्षेत्रामध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. वडीलधारी मंडळींच्या आशीर्वादाने व महिला सखी आणि मैत्रिणीच्या भक्कम साथ यामुळे सध्या त्या प्रत्येक सामाजिक कार्यामध्ये स्वतःला सिद्ध करून दाखवत आहे. स्वयं सिद्धा म्हणजे स्वतःच अस्तित्व निर्माण करणे. आज ग्रामीण भागातील शेकडो कुटुंबीयांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी लघुउद्योगाच्या माध्यमातून त्यांनी जाळे निर्माण केले आहे. यासाठी अनेकांचे सहकार्य लाभत आहे.
ग्रामीण भागातील गरीब कष्टकरी यांना शासकीय आरोग्य सुविधा मिळावी यासाठी ते प्रयत्न करत आहेत. सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील शासकीय रुग्णालयातील पीसीपीएनडीटी कमिटीच्या अध्यक्ष म्हणून ते कार्यरत आहेत.समन्वय यशवंतराव चव्हाण सेंटर, समन्वयक, सदस्य, यशस्विनी सामाजिक अभियान ,दिशा समिती, जिल्हा परिषद
सामाजिक संस्थेच्या माध्यमातून तसेच सातारा जिल्ह्यातील अनेक शासकीय कमिट्यांच्यावर काम करत असताना सामान्य माणसांचे प्रश्न मांडून त्याची सोडवणूक करत आहेत.

संस्थेच्या माध्यमातून कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे अंतर्गत वीस हजार महिलांना व्यवसायिक प्रशिक्षण देण्यात आले. तसंच त्यांच्या निर्मितीतून तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून दिले आहे. वंशाला दिवा म्हणून मुलगा हवा अशा जुन्या विचाराला छेद देण्याचे काम करून घरात मुलगी जन्माला आली. तिचे नाव ठेवण्याचा कार्यक्रम यामध्ये मानसिकता बदलली. सौ. समिंद्राताई जाधव यांनी नावडत्या बालिकेला नकोसा ऐवजी लाडली हे नामकरण करून महाराष्ट्र मध्ये क्रांती घडवून आणली आहे. शिक्षण माता सावित्रीबाई फुले यांच्या सातारा जिल्ह्यामध्ये आपल्या हातून मोठे कार्य घडले आहे त्यांना सार्थ अभिमान वाटत आहे.
नकुसा नामकरण सोहळा स्वयं सिद्धा संस्थेच्या माध्यमातून पहिल्यांदाच महाराष्ट्रात राबवण्यात आला. तब्बल २२२ नकूसा नाव असणाऱ्या मुलींचे नामकरण करण्यात आले. या सर्वांचे नावे राजपत्रित मध्ये स्वतःच्या खर्चाने प्रसिद्ध करून त्यांना नवी ओळख निर्माण करून दिली.
पुणे रोटरी क्लब व एस. सी. डब्ल्यू. कॅनडा इथून ग्रामीण भागातील मुलांना सुखाने झोप मिळण्यासाठी पाच कोटी रुपयांचे स्लीपिंग किट वितरण केले. महिलांच्या सार्वजनिक सणासुदीला सर्व महिला समान आहेत हा संदेश दिला.विधवा प्रथा बंद व्हावी यासाठी संस्थेच्या माध्यमातून पन्नास ग्रामपंचायतीमध्ये ठराव घेण्यात आले. गावकुसा बाहेरील तसेच वाड्या वस्तीतील गरीब कष्टकरी महिलांना स्वाभिमानाने जगता यावे यासाठी महिला बचत गट स्थापन करण्यासाठी सहकार्य केले. त्यांनी तयार केलेल्या मजबूत व टिकाऊ

वस्तूंना स्थानिक बाजारपेठे सोबतच मोठ्या शहरातील मॉलमध्ये वस्तू विक्रीसाठी अल्प दरात व मोफत जागा उपलब्ध करून दिली. बाजारपेठ मिळवण्यासाठी यशस्विनी सामाजिक अभियान माध्यमातून रिलायन्स मॉल उपलब्ध करून दिले.

कोविड काळात संस्थेच्या माध्यमातून पाच लाख रुपयांचे गोरगरिबांना धान्य वितरण केले. यांच्या संसाराला हातभार लावला.
एक हजार
पिको फॉल मशीन थेट कंपनीतून महिलांपर्यंत उपलब्ध करून दिले. सध्या वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधींच्या मार्गदर्शनाखाली

एकल महिलांसाठी संस्थेच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू झाली आहेत. या कार्याची नोंद घेऊन तसेच संस्थेची अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र शासनाने आत्तापर्यंत अनेक पुरस्कार देऊन गौरव केला आहे. सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असताना अनेकांचे सहकार्य लाभले आहे. सामाजिक जाणीव असलेल्या मैत्री दिंडी खांद्याला खांदा लावून सहकार्य केल्यामुळेच आतापर्यंत अनेक कर्जुबाईलांना सहकार्य करण्यास शक्ती मिळाली आहे. ही नारीशक्ती भजी सामुदायिक महिलांच्या प्रगतीचे सुंदर रांगोळी आहे. यामध्ये रंग भरणे करण्यासाठी अनेकांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. अशा या स्वयंसिद्ध महिला संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती समिंद्राताई जाधव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात वाढदिवस साजरा न करता दुष्काळग्रस्तांना मदत करण्याचा संकल्प त्यांनी केला आहे.. (शब्दांकन- अजित जगताप सातारा) — राजश्री पाटील, सातार

भाग्यवती जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *