देवीची ओटी भरायला आले होते पण मला ही ओटी तुम्हाला अर्पण करायची आहे सावित्रीमाई….श्री अंबिका देवी प्रभावती माता सांगोला प्रतिनिधीदोनशे वर्षांपूर्वी स्त्री शिक्षणासाठी जो सावित्रीबाई फुले यांनी संघर्ष केला व तो हुबेहूब सिनेअभिनेत्री संध्या पानसकर यांनी सावित्रीबाईची भूमिका इतक्या प्रभावीपणे व ताकतीने केली व तिचा अभिनय पाहून अनेक प्रेक्षकांना स्त्रियांना हुंदके आवरता आले नाहीत, हृदयाला ठाव घेणारी प्रभावी संवाद ऐकून अनेकांच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या तर अनेकांच्या भावना उचंबळून आल्या व या कार्यक्रमास स्त्रिया खूपच भाऊक झाल्या व त्यातील एक बाई अंबिका देवीची ओटी भरण्यासाठी आणलेली ओटी तुम्हाला अर्पण करायची आहे सावित्रीमाई असे म्हणून अक्षरशा ओटी भरली व यामुळे खरंतर हे नाट्य नाही, सत्य आहे, थेट प्रेक्षकांच्या हृदयात प्रवेश करून संवेदशील बनून एकरूप झालं व शहरापासून खेड्यापर्यंत सावित्री मातेच्या प्रबोधनाचा जागर मेडशिंगी ता. सांगोला गावात संपन्न झाला व कलाकार संध्या पानसकर यांचा अभिनय पाहून अनेक महिला रडत होत्या व संध्याने मागील दोनशे वर्षात जी सावित्री मातेची परिस्थिती होती ती दाखवून दिली. निमित्त होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोंबर रोजी बुद्ध धर्म स्वीकारला याचे औचित्य व नवरात्र उत्सव निमित्त मेडशिंगी भूषण सिद्धार्थ कसबे, सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त यांनी या कार्यक्रमाचे मोफत आयोजन केले होते.दुपारी देशभक्त संभाजीराव शेंडे विद्यालय सदरचा कार्यक्रम झाला व यावेळी विद्यार्थी व विद्यार्थिनी भारावून गेल्या, यावेळी प्राचार्य सी.बी. रोंगे, पर्यवेक्षक सूर्यकांत कसबे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर, विद्यार्थी उपस्थित होते तर नवरात्र महोत्सवात रात्री हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी मंडळाचे सर्वेसर्वा आप्पा इंगोले, अनिल शेंडे, सूतगिरणीच्या चेअरमन कल्पनाताई शिंगाडे, सेवानिवृत्त केंद्रप्रमुख प्रभाकर कसबे, विनोद कसबे, सूर्यकांत कसबे, अतुल कसबे, प्रशांत पाटील, ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी मेडशिंगी भूषण सिद्धार्थ कसबे, प्रा. देविदास कसबे, दिग्दर्शक संदेश गायकवाड, कलाकार संध्या पानसकर यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन सेवानिवृत्त मुख्याध्यापक सुनील नष्टे यांनी तर सर्वांचे आभार कल्पनाताई शिंगाडे यांनी मानले.__________________________आज महाराष्ट्रात महिलांची व मुलींची अवस्था पाहिली तर वाढा, रांधा, उष्टे काढा, चूल व मूल या भोवतीच फिरत आहे, महिला साक्षर झाल्या नोकरी करू लागल्या तसेच राजकीय क्षेत्रात काम करू लागल्या परंतु त्यांना म्हणावे असे स्वातंत्र्य मिळत नाही व स्त्री स्वातंत्र्याचे कितीही गोडवे गायले जात असले तरी ते सध्या संमेलना पुरते मर्यादित असते तर असे न होता समाजात जनजागृती होण्यासाठी यातून बोध घेण्यासाठी संघर्ष यात्री सावित्रीबाईंचा हृदयपशी नाटकाचे आपण मेडशिंगी येथे मोफत आयोजन केले होते.मा. सिद्धार्थ कसबे मेडशिंगी भूषण, सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त मुंबई.__________________________ Post navigation सिंहगडावरील खाजगी रोपवेला शिव-शंभुभक्तांचा तीव्र आक्षेप ;