म्हसवड वार्ताहर …

पुळकोटी केंद्रस्तरीय बाल क्रीडा स्पर्धा मेघा सिटी म्हसवड येथे उत्साहात पार पडल्या.

केंद्र शाळा पुळकोटी यांच्या वतीने केंद्रस्तरीय बाल क्रीडा स्पर्धांचे उत्साहात आयोजन करण्यात आले.

केंद्रप्रमुख किरण खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध वैयक्तिक व सांघिक क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृति प्रित्यर्थ आयोजित केलेल्या स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
वैयक्तिक क्रीडा प्रकारांमध्ये १०० मीटर, २०० मीटर, ४०० मीटर, ६०० मीटर, ८०० मीटर धावणे, लांब उडी, योगासन, थाळीफेक व गोळाफेक या स्पर्धांचा समावेश होता. तसेच सांघिक प्रकारात ४ बाय १०० मीटर रिले रस्सीखेच, कबड्डी, खो-खो व लंगडी या स्पर्धा लहान व मोठया गटात पार पडल्या.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारांत उत्स्फूर्त सहभाग नोंदवत उत्कृष्ट कामगिरी केली. अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्याचे प्रभावी प्रदर्शन करून उल्लेखनीय यश संपादन केले. सांघिक क्रीडा प्रकारातही विविध शाळांच्या संघांनी दमदार खेळाचे प्रदर्शन करत उल्लेखनीय कामगिरी केली.


क्रीडा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमध्ये खेळाडूवृत्ती, संघभावना, शिस्त, आत्मविश्वास व नेतृत्वगुण विकसित होण्यास मदत झाली. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी पुळकोटी केंद्रातील शिक्षक, मुख्याध्यापक क्रीडा मार्गदर्शक व संबंधित शाळांच्या शिक्षकांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *