सुयोग्य शैक्षणिक नियोजन यशाचा पाया-कृषिरत्न विश्वंभर बाबर


म्हसवड (प्रतिनिधी)-
सुयोग्य शैक्षणिक नियोजन हा यशाचा पाया असल्याचे प्रतिपादन क्रांतिवीर शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर यांनी पालक सभा उपक्रमात केले.
कृषी विकास प्रतिष्ठान संचलित आत्मगिरी माध्यमिक विद्यालया अंतर्गत शिक्षक, पालक, व इयत्ता 9 वी तील विद्यार्थ्यांची एकत्रित समन्वय सभा आयोजित केली होती. अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष कृषिरत्न विश्वंभर बाबर होते. प्रमुख मान्यवर म्हणून पालक प्रतिनिधी संजय काळेल व ललिता कारंडे , शिक्षक पालक तसेच मुख्याध्यापक अनिल माने उपस्थित होते.
यावेळी बोलताना विश्वंभर बाबर म्हणाले माध्यमिक स्तरावर इयत्ता दहावी चे वर्ष विद्यार्थ्यां साठी महत्त्वाचा शैक्षणिक टप्पा आहे. ऐन वेळच्या ताण-तणावाला टाळण्यासाठी आगामी शैक्षणिक वर्षाचे योग्य नियोजन महत्त्वाचे आहे. सुयोग्य नियोजन केल्यास विद्यार्थी सहजपणे बोर्डाच्या परीक्षेला सामोरा जाऊ शकतो. विद्यार्थ्यांना सर्व गुणसंपन्न बनवण्यासाठी शिक्षकांबरोबरच पालकांची जबाबदारी सुद्धा महत्त्वाची आहे. पाल्यावर अवाजवी अपेक्षा लादू नका. त्यांना नेहमी प्रोत्साहन द्या. त्याच्या आहार व विहार बाबत काळजी घ्या. स्पर्धेच्या जगात टिंकण्यासाठी अभ्यासाबरोबर कला व क्रीडा क्षेत्रातील विद्यार्थी सहभाग महत्त्वाचा आहे . पाल्याची मानसिकता लक्षात घ्या. ज्यादा क्लासचे ओझे त्याच्यावर लादू नका. टीव्ही,मोबाईल तसेच विद्यार्थ्यांची संगत याबाबत योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन प्रा. बाबर यांनी पालकांना केले.
क्रांतिवीर शैक्षणिक संकुलाचे यंदा रौप्य महोत्सवी वर्ष असून शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांच्या चांगल्या समन्वयामुळेच संस्थेची सर्वांगीण प्रगती झाल्याचे बाबर यांनी सांगितले. पालकांचा विश्वास हाच आमचा श्वास असल्याचेही विश्वंभर बाबर यांनी अनेक उदाहरणासह स्पष्ट केले.
मुख्याध्यापक अनिल माने यांनी आगामी इयत्ता दहावीच्या शैक्षणिक वर्ष उपक्रम व नियोजनाची माहिती मुद्दे निहाय दिली. पालकांची जबाबदारी, विद्यार्थ्यांचे कर्तव्य तसेच संस्थेतर्फे आगामी शैक्षणिक वर्षात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची तपशीलवार माहिती मुख्याध्यापक अनिल माने यांनी सांगितली. पालक प्रतिनिधी संजय काळेल, ललिता कारंडे तसेच अनेक पालकांनी संस्थेच्या सुयोग्य व दर्जेदार नियोजनाबद्दल मनोगताद्वारे समाधान व्यक्त केले तसेच सकारात्मक सूचना सुद्धा केल्या. समन्वय सभेसाठी विद्यार्थी पालक यांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षिका कल्याणी सुतार यांनी केले तर उपस्थित मान्यवराचे आभार पांडुरंग भोसले यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या:
प्राथमिक शिक्षक सह.बँक सातारा शाखा म्हसवड यांच्या वतीने म्हसवड कर्तृत्ववान महिलांचा सन्मान    |    पंढरपूर येथे शिक्षक परिषदेचा प्रशिक्षण वर्ग उत्साहात संपन्न    |    राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्कार साठी प्रस्ताव पाठविण्याचे बसव प्रतिष्ठानचे आवाहन    |    बाल आनंद मेळावा आदर्श उपक्रम - सभापती विक्रम शिंगाडे    |    दुष्काळातून घडलेली माणसं… आज अधिकारी बनूनही आपुलकी कायम!    |    माणदेशी न्यूज - ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा आमचे चॅनल!