….


सांगोला प्रतिनिधी
काळ कितीही पुढे गेला तरी कॉलेज जीवनाची आठवणी मनातून कधी पुसल्या जात नाहीत, 45 वर्षांपूर्वी एकत्र बसणारे, एकत्र खेळणारे वर्गमित्र, मैत्रिणी पुन्हा एकदा भेटल्या मित्र संमेलनात आणि यामधून काही क्षणासाठी काळ जणू मागे वळला व यामधून दुनिया का सबसे किमती तोहफा एक अच्छा मित्र, मैत्रीण है…. हे समजून आले व यासाठी एक दिवस विद्यार्थी म्हणून जगा मग सर्व काही मिळाले म्हणून समजा व ते जपा व स्नेहसंमेळाव्यात गुरुजनाविषयी कृतज्ञता व्यक्त केली असे गौरव उद्गार मा. प्राचार्य डॉ. कृष्णा इंगोले यांनी सन 1980 ते 1985 बॅचच्या मित्र संमेलनात श्रीराम हॉटेल सांगोला येथे काढले.
सुरुवातीस गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या तैल चित्रास पुष्पहार अर्पण केला तसेच मान्यवर गुरुवर्य प्राचार्य डॉ. कृष्णा इंगोले, मा. प्रा. विजयकुमार शेटे, प्रा. रावसाहेब रेड्डी, प्रा. विजयकुमार जाधव, प्रा. भारत लोंढे, प्रा. शंकर पाटील, प्रा. भीमराव फुले, प्रशासकीय अधिकारी नामदेव सुरवसे, दिलीप नष्टे, नानासो लिगाडे, मधुकर कसबे, प्रा. देविदास कसबे, प्रा. शैलजा कुलकर्णी, श्रीकांत घोंगडे, साधना गुळमिरे, शिवप्रभा पाटील यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करण्यात आले तर स्वागत गीत स्नेहलता खारवे, विजया खडतरे, शैलजा कुलकर्णी यांनी म्हटले. गुरुवर्य यांचे स्वागत कल्पना नष्टे, रमेश गोडसे, जमीला इनामदार, शैलजा कुलकर्णी, सुशीला नांगरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सहकार्य मित्र, गुरुवर्य आपल्यात नाहीत त्यांना सर्वांनी श्रद्धांजली वाहिली तर सांगोला महाविद्यालयालयाने आम्हास खूप काही दिले व त्या काळातील सर्व सवंगडी एकत्र येऊन गेट-टुगेदर किंवा मित्र संमेलन करताना आनंद होत आहे व यामधून सर्वांनी सामाजिक बांधिलकी जोपासावी असे प्रास्ताविकात विद्यार्थी प्रा. देविदास कसबे यांनी सांगितले. तर प्रा. रावसाहेब रेड्डी, प्रा. विजय जाधव, प्रा. विजयकुमार शेटे, प्रा. शंकर पाटील हे आमचे विद्यार्थी वेल सेटल परिवाराचे आहेत व भाग्यवान आहेत असे मनोगतात सांगितले.
यावेळी स्वराद गेजगे बालकलाकार यांनी उडून गेलेली पाखरे स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र आले तर साधना गुळ मिरे, श्रीकांत घोंगडे यांच्या कला दर्शनाने सर्वांना मनमोहीत केले तर रवींद्र बोत्रे यांनी भक्ती गीतातून सर्वांना देवाचे दर्शन घडविले तर सुभाष गेजगे यांनी मैत्रीचा कट्टा म्हणून का वट्टा म्हणू यावर काय पण म्हणा परंतु एकत्र या हा संदेश दिला तर शैलजा कुलकर्णी, जमीला इनामदार, सुशीला नांगरे, प्रा. देविदास कसबे, शहाजी चंदनशिवे, विजया खडतरे, सुभाष गेजगे, कल्पना नष्टे, शहाजी गेजगे, केशव सुर्वे, श्रीपाद भोसेकर, अभय कदम, स्नेहलता खारवे यांनी विविध कला दर्शनाने स्नेहसंमेलनात शोभा आणली.
सदर प्रसंगी वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असलेले हुशार विद्यार्थी मुसा इनामदार, रविराज शेटे, संजय खडतरे, विनायक कुलकर्णी, हमीद इनामदार, रामचंद्र भजनावळे, बाळकृष्ण घाडगे, बबनराव जानकर, अनिल शेंडे, अमर गुळमिरे, तानाजी सुरवसे, धनंजय पलसे, गजानन खडतरे, हसीना खतीब, संजय पाटील, अशोक दौंडे, रावसाहेब काटे, विलास घुले, लियाकत इनामदार, नारायण जानकर, बाळकृष्ण कवडे, बाबासाहेब पाटोळे, सुहास घाटे, दीपक कांबळे, शिवाजी पाटील, किशोर शिंदे, धर्मराज बोराडे, अरुण भंडारे, मुरलीधर इमडे, श्रीकांत भंडारे, भास्कर केदार, दत्तात्रय पाटील, सूर्यकांत सावंत, नंदकुमार माने, संजय चांदणे, मधुकर नवले, कयूम मुजावर, हनुमंत भोसले, दीपक कांबळे, चंद्रकांत भंडारे, मज्जित खतीब, इ. वर्गमित्र उपस्थित होते. सूत्रसंचालन स्नेहलता खारवे, शैलजा कुलकर्णी यांनी अतिसुंदर केले तर आभार शहाजी चंदनशिवे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *