मायणी (प्रतिनिधी)-
ग्रामीण भागातील गुणवत्तेचे केंद्र म्हणून ओळखले जाणाऱ्या स्फूर्ती शिक्षण प्रसारक मंडळ मायणी संचलित आनंद इंग्लिश स्कूल मायणी या विद्यालयाने पुन्हा एकदा आपली शैक्षणिक मोहोळ उमटवली आहे नुकत्याच झालेल्या एन एम एम एस परीक्षेत चार विद्यार्थ्यांनी दैदीप्यमान यश संपादित करून शिष्यवृत्ती पटकवले आहे.
या विद्यालयाच्या शिस्तबद्ध वातावरण व योग्य मार्गदर्शन यामुळे संजना संतोष लुगडे, आदर्श मनोज सानप, वेदिका अजित का बुगडे, सिमरन राजेंद्र यलमर, या विद्यार्थ्यांनी शाळेच्या व गावच्या लौकिकात भर घातली आहे सदर विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष दिलीपरावजी येळगावकर, सचिव अभिजीत येळगावकर, राजाराम कचरे, संस्थेचे सर्व संचालक, शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीने या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या:
“निर्भया पथकाला बालविवाह रोखण्यात यश; अल्पवयीन मुलीला मिळाले नवजीवन”    |    वडूजच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी; सहा महिन्यांत महत्त्वाची विकासकामे मार्गी – नगराध्यक्ष स्वप्नाली गोडसे    |    हिंगणी ग्रामपंचायत कार्यालयाला ग्रामस्थांनी ठोकले टाळे; ग्रामीण मार्ग क्र. १४४ च्या प्रश्नावरून संताप    |    आजचे राशीभविष्य.. 1 जून 2026..    |    म्हसवड येथील नगरवाचनालयात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती उत्साहात साजरी    |    म्हसवड पोलीसांचा दारु भट्टी वर छापा..    |    स्वच्छ बस स्थानक स्पर्धेत म्हसवड पुणे विभागात द्वितीय    |    आपली साथ आणि आशीर्वाद द्या- राजा माने    |    माणदेशी न्यूज - ताज्या घडामोडींसाठी वाचत रहा!