म्हसवड…प्रतिनिधी
सामान्य घरातील अपघात ग्रस्त पालकाची व्यथा एका कार्यक्रमाच्या निमित्ताने संस्था अध्यक्ष व शिक्षकांना समजली . शिक्षकांनी केलेल्या आवाहना नुसार क्रांतिवीर शैक्षणिक संकुलातील विद्यार्थ्यांनी आपल्या खाऊच्या पैशातून चिमुकल्या वर्ग मैत्रिणीच्या अपघात ग्रस्त वडीलास संस्था, शिक्षक व विद्यार्थ्यातर्फे तीस हजार रुपये चा धनादेश संबंधित पालकाला प्रदान करून शैक्षणिक क्षेत्रात दर्जेदार असणाऱ्या क्रांतिवीर शैक्षणिक संकुलाने दातृत्वाचा एक अनोखा उपक्रम समाजापुढे ठेवला आहे.
क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी शाळा म्हसवड मध्ये वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत इयत्ता पहिलीतील विद्यार्थिनी शिवन्या निलेश राऊत राहणार मार्डी हिने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर अत्यंत दर्जेदार, अभ्यासू परखड व भावनिक भाषण केले. या भाषणाबद्दल शिवन्या राऊत हिला उपस्थित शिक्षक व मान्यवरांनी एकूण 700 रुपये चे रोख बक्षीस दिले. यावेळी शिक्षिका पुनम जाधव यांनी शिवन्या हिस विचारले या बक्षिसाचे काय करणार ? चिमुकल्या शिवन्या राऊत हिने अत्यंत मार्मिक व हृदयाला स्पर्श करणारे भावनिक उत्तर दिले. तिच्या घरची चित्तरकथा उपस्थितांना समजली. काही दिवसांपूर्वी माझ्या वडिलांचा अपघात झाला आहे. पहिले ऑपरेशन अयोग्य झाल्याने पुन्हा ऑपरेशन करायचे आहे. माझ्या बक्षिसाची ही रक्कम मी माझ्या वडिलांना देणार असल्याचे तिने सांगितले.
चिमुकल्या शिवन्याची ही भावनिक हाक ऐकून उपस्थित शिक्षकांना गहिवरून आले व अनेकांना आपले अश्रू अनावर झाले.
शिक्षकांनी संबंधित घटनेची माहिती संस्था अध्यक्ष कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर , व मुख्याध्यापिका सुलोचना बाबर यांना दिली. शिवन्या राऊत हिच्या वडिलांना मदत करण्यासाठी संस्थेतर्फे सर्व विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात आले. विद्यार्थी ,पालक, व शिक्षक यांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन मदतीचा खारीचा वाटा म्हणून रक्कम एकत्रित केली. सर्वांच्या मदतीने एकत्रित केलेल्या रकमेचा रुपये तीस हजार चा धनादेश संस्था अध्यक्ष विश्वंभर बाबर यांच्या हस्ते मार्डी येथील त्यांच्या घरी जाऊन अपघात ग्रस्त निलेश राऊत यांना देण्यात आला. यावेळी सर्वांनाच गहिवरून आले. या सगळ्यास कारणीभूत ठरली चिमुकली शिवन्या. छत्रपती शिवरायांच्या बद्दल तिने केलेले भावनिक भाषण. तिच्या भाषणास शिक्षकांनी दिलेला प्रतिसाद. मिळालेले बक्षीस व चिमुकल्या शिवन्याची आपल्या अपघात ग्रस्त वडिला प्रति असणारी दूरदृष्टी एक अनमोल आशेचा किरण ठरला.
मार्डी येथील डॉक्टर उज्वल कुमार काळे यांनी क्रांतिवीर शैक्षणिक संकुला तील शिक्षक विद्यार्थी व संस्थाप्रमुख विश्वंभर बाबर यांनी दाखवलेल्या दातृत्वाबद्दल अत्यंत भावनिक समाधान व्यक्त केले. प्राचार्य विठ्ठल लवटे, प्राचार्य विन्सेंट जॉन व मुख्याध्यापक अनिल माने यांनी मोलाचे सहकार्य केले. मार्डी येथे मुख्याध्यापिका सुलोचना बाबर, पूनम कोकणी, पूनम जाधव , अलिषा मुल्ला, सचिन बाबर, महावीर झिमल, सुहास भिवरे, क्रांतिवीर संकुलातील विद्यार्थी प्रतिनिधी, शिवन्याचे कुटुंबीय,तसेच मार्डी ग्रामस्थ उपस्थित होते . शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या क्रांतिवीर शैक्षणिक संकुलाने आपल्याच कुटुंबातील एका चिमुकल्या विद्यार्थिनीच्या अपघात ग्रस्त वडीलास उपचारासाठी केलेल्या मदतीमुळे विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी समाधान व्यक्त केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या:
“निर्भया पथकाला बालविवाह रोखण्यात यश; अल्पवयीन मुलीला मिळाले नवजीवन”    |    वडूजच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी; सहा महिन्यांत महत्त्वाची विकासकामे मार्गी – नगराध्यक्ष स्वप्नाली गोडसे    |    हिंगणी ग्रामपंचायत कार्यालयाला ग्रामस्थांनी ठोकले टाळे; ग्रामीण मार्ग क्र. १४४ च्या प्रश्नावरून संताप    |    आजचे राशीभविष्य.. 1 जून 2026..    |    म्हसवड येथील नगरवाचनालयात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती उत्साहात साजरी    |    म्हसवड पोलीसांचा दारु भट्टी वर छापा..    |    स्वच्छ बस स्थानक स्पर्धेत म्हसवड पुणे विभागात द्वितीय    |    आपली साथ आणि आशीर्वाद द्या- राजा माने    |    माणदेशी न्यूज - ताज्या घडामोडींसाठी वाचत रहा!