म्हसवड वार्ताहर … भारताचा 80 वा स्वातंत्र्य दिन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरतावमध्ये मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीमय वातावरणामध्ये संपन्न झाला. कार्यक्रमासाठी शिरताव गावचे सरपंच हणमंत विरकर,उपसरपंच सावित्री सरतापे, सर्व सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश खळवे उपाध्यक्ष मयुरी विरकर, सर्व सदस्य, गावातील सर्व ग्रामस्थ, महिला भगिनी यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. शाळेचे ध्वजारोहण अध्यक्ष गणेश खळवे यांच्या हस्ते करण्यात आले.मुलांनी संगीत कवायत उत्कृष्ट सादर केलीतसेच लेझीम नृत्य विशेष आकर्षण ठरले.. त्याचबरोबर विद्यार्थी मनोगते सादर झाली. मुख्याध्यापक सुशील त्रिगुणे यांनी सर्व मुलांना विषमुक्त स्वयंपाक घर तसेच साक्षरतेचि शपथ दिली व स्वातंत्रदिनाचे महत्त्व विशद केले. त्याचबरोबर विविध देशभक्ती गीतावर सांस्कृतिक कार्यक्रम अतिशय बहारदार सादर केला .समूल सरतापे यांनी सर्व मुलांना स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले वव शिक्षकांना ऑफिस बॅग देण्यात आल्या प्रथमेश शिंगाडे व डॉक्टर रुपेश वाघमारे यांनी पाणी बॉटल दिल्याव गणेश.निकाळजे यांनी शाळेसाठी सतरंजी दिल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल पाटोळे सर यांनी केले. Post navigation क्रांतिवीर संकुलात स्वातंत्र दिन उत्साहात साजरा वीरशैव श्री पुरस्कारप्राप्त प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांचा सांगोला विद्यामंदिर रिटायर्ड ग्रुपतर्फे सत्कार