सांगोला प्रतिनिधी अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासभा, बेंगळुरू यांच्या वतीने शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील प्रदीर्घ आणि उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांना मानाचा ‘वीरशैव श्री’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. या राष्ट्रीय स्तरावरील सन्मानाबद्दल सांगोला विद्यामंदिर रिटायर्ड ग्रुपच्या वतीने सांगोला विद्यामंदिर प्रशालेतील टेक्निकल हॉलमध्ये त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. सेवानिवृत्त प्राचार्य संजीव नाकील,सेवानिवृत्त उपमुख्याध्यापक तायाप्पा आदट,सेवानिवृत्त पर्यवेक्षक दामोदर नागणे आणि पत्रकार रविराज शेटे यांच्या हस्ते प्रा. झपके यांना शाल, टोपी,मम हृदयी आशा आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाच्या औचित्याने, सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांच्या गाण्यांवर आधारित ‘मम हृदयी आशा’ या अनेक लेखांचा संग्रह असलेल्या विशेष पुस्तकाचा संदर्भही यावेळी अधोरेखित करण्यात आला. या पुस्तकात प्रा. राजेंद्र ठोंबरे व सौ. मनिषा ठोंबरे यांच्या अभ्यासपूर्ण लेखांचा समावेश आहे.या सोहळ्यास सांगोला विद्यामंदिर रिटायर्ड ग्रुपचे प्रवर्तक प्रा. राजेंद्र ठोंबरे, सेवानिवृत्त प्राचार्य मीरा अंकलगी, वंदना महिमकर, सेवानिवृत्त प्राचार्य महादेव बोराळकर, बाळासाहेब वाघमारे, नारायण विसापूरे, सुभाष महिमकर, भीमाशंकर पैलवान, सुभाष दिघे, शंकर डोंबे, प्रकाश धोत्रे, कमलाकर महामुनी, प्रा. उत्तम घाटुळे, पत्रकार रविराज शेटे, अमर गुळमिरे, नारायण राऊत, सिद्धेश्वर काळे, नागनाथ गयाळी यांच्यासह अनेक मान्यवर, सेवानिवृत्त शिक्षक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा. झपके यांच्या या यशामुळे शैक्षणिक, सामाजिक वर्तुळात तसेच वीरशैव लिंगायत समाजात आनंदाचे वातावरण पसरले असून सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. Post navigation सायगाव परिसरात कालव्याची अवस्था झाली झाड झुडपातील पाऊलवाट पळसावडे जिप शाळेला माजी विद्यार्थ्यांकडून ४३ इंची एल ई डी टीव्ही भेट