म्हसवड…. प्रतिनिधी
क्रांतिवीर शैक्षणिक संकुलातील विविध शाखा मध्ये 15 ऑगस्ट हा देशाचा 80 वा स्वातंत्र्य दिन विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
स्वातंत्र्यदिनानिमित्त क्रांतिवीर संकुलातील नागनाथ अण्णा नायकवडी शाळा म्हसवड व आत्मगिरी माध्यमिक विद्यालय म्हसवड यांच्या कार्यक्रमात पालक प्रतिनिधी सिद्धनाथ येवले यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संस्था अध्यक्ष कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर, मुख्याध्यापिका सुलोचनाबाबत मुख्याध्यापक अनिल माने व पूनम जाधव उपस्थित होते तर क्रांतिवीर इंग्लिश मीडियम सीबीएसई व क्रांतिवीर ज्युनिअर कॉलेज यांच्या कार्यक्रमात संस्था उपाध्यक्ष ॲडव्होकेट इंद्रजीत बाबर व सौ हर्षदा बाबर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्राचार्य विठ्ठल लवटे., प्राचार्य विन्सेंट जॉन , उपप्राचार्य जया नायर, समन्वयक अभिजीत सावंत, शिक्षक पालक इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी कृषिरत्न विश्वंभर बाबर, संस्था उपाध्यक्ष ॲडव्होकेट, इंद्रजीत बाबर, सौ,हर्षदा बाबर यांनी मनोगतद्वारे स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व स्पष्ट केले. शालेय शिष्यवृत्ती परीक्षेत विशेष यश संपादन केल्याबद्दल आदित्य येवले व स्नेहल येवले तसेच येवले कुटुंबियांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या निमित्ताने देशभक्तीपर गीत गायन, रंगीबेरंगी साधना सह कवायती, देशभक्तीपर गाण्यावर नृत्य, रंगीबेरंगी, आकर्षक वेशभूषा या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपले कलागुण सादर केले. शिवन्या राऊत हिने देशभक्तीपर मनोगत व्यक्त केले . यानिमित्ताने विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. उपशिक्षिका सौ मेघा मोरे यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *