म्हसवड…. प्रतिनिधी
म्हसवड शहरातील सार्वजनिक आरोग्य स्वच्छ, सुंदर व दर्जेदार ठेवण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन म्हसवड नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पूजा विरकर यांनी म्हसवड येथे केले.
क्रांतिवीर शैक्षणिक संकुलातील आत्मगिरी माध्यमिक विद्यालयात घनकचरा व्यवस्थापन प्रबोधन कार्यक्रम आयोजित केलेला होता. यावेळी म्हसवड नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पूजा सचिन विरकर, उपनगराध्यक्ष श्रीदेवी पिसे, आरोग्य सभापती विजय बनगर, नगरसेवक महावीर वीरकर, नगरसेविका अरुणा गायकवाड, चैताली शिंदे, दिपाली शिंदे , व माधुरी लोखंडे, पुनम वीरकर तसेच नगरपालिका स्वच्छता विभागाचे
शहर समन्वयक आकाश पिसे, रमेश उमराणी, याबरोबरच क्रांतिवीर शैक्षणिक संकुलातील विद्यार्थी उपस्थित होते .
यावेळी बोलताना नगराध्यक्ष पूजा विरकर म्हणाल्या म्हसवड नगरपालिकेचे पावित्र्य व स्वच्छता राखण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. शहराचे आरोग्य स्वच्छ सुंदर, व सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी नागरिक ,रहिवासी तसेच शालेय विद्यार्थी याबरोबरच युवा पिढीवर आहे. प्लास्टिक मुक्ती महत्त्वाची असून विद्यार्थ्यांमध्ये त्याबाबतचे प्रबोधन गरजेचे आहे. त्यासाठी म्हसवड नगरपालिका जनजागृती करीत आहे.
बलशाली भारतासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांनी स्वच्छतेबाबतच्या चांगल्या सवयी स्वतःच आचरणात आणाव्यात
व नगरपालिकेला सहकार्य करावे असे आवाहन नगराध्यक्षा पूजा विरकर यांनी केले.
यावेळी बोलताना नगरसेवक महावीर विरकर म्हणाले शहराचे आरोग्य चांगले राखण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्लास्टिक कचरा संकलित करून घनकचरा व्यवस्थापनासाठी सहकार्य करावे . आपले घर, आपला परिसर स्वच्छ सुंदर केल्यास नगरपालिका स्वच्छ व सुंदर होईल असा विश्वास विरकर यांनी व्यक्त केला. व स्वच्छ सर्वेक्षण टप्पा दोन बाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका सुलोचना बाबर यांनी केले व स्वच्छतेमध्ये क्रांतिवीर शैक्षणिक संकुलातील सर्व शाखा आघाडीवर असल्याचे सांगितले. तर क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी शाळेला स्वच्छतेबाबत राज्यस्तरावर पुरस्कार मिळाल्याचेही सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व उपस्थिततांचे आभार मुख्याध्यापक अनिल माने यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *