संरक्षण सेवा हीच खरी देशसेवा असल्याने प्राधान्य द्या- विलास इंदलकर म्हसवड…प्रतिनिधीसध्या सर्वत्र स्पर्धेचे युग असून विद्यार्थ्यांसाठी संरक्षण सेवा हीच खरी देशसेवा असल्याने या सेवेला प्राधान्य द्या असे आवाहन राज्याच्या जीएसटी विभागाचे माजी अप्पर आयुक्त विलास इंदलकर यांनी म्हसवड येथे केले.क्रांतिवीर शैक्षणिक संकुल म्हसवड येथे पालक व विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन उपक्रम आयोजित केला होता. अध्यक्षस्थानी कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर होते. यावेळी संस्था सचिव सुलोचना बाबर,संस्था उपाध्यक्ष ॲडव्होकेट इंद्रजीत बाबर ,हर्षदा बाबर प्राचार्य विन्सेंट जॉन, विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर,शिक्षक पालक उपस्थित होते. यावेळी बोलताना विलास इंदलकर म्हणाले म्हणाले जगात सर्वच क्षेत्रात जीवघेणी स्पर्धा सुरू आहे.ग्रामीण भागातील विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धा परीक्षांमध्ये टिकण्यासाठी सीबीएसई शिक्षण प्रणाली अत्यंत महत्त्वाची आहे. सीबीएसई हा नीट परीक्षेचा पाया असून या ठिकाणी सुरू असणाऱ्या सुविधेचा लाभ घेणे गरजेचे आहे.प्रामुख्याने यूपीएससी व राष्ट्रीय स्तरावरील विविध परीक्षेचा सीबीएसई अभ्यासक्रम हा बेसिक कणा आहे. चांगला विद्यार्थी घडला तरच चांगला देश आपोआपच घडेल.त्यासाठी शिक्षकांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. देशाची आर्थिक व शैक्षणिक प्रगती साधण्यासाठी सुयोग्य शिक्षण प्रणाली महत्त्वाचे असते. ग्रामीण भागात सुद्धा अगदीच कमी फी च्या माध्यमातून कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर व सुलोचना बाबर यांनी क्रांतिवीर सीबीएसई विद्यालयाच्या माध्यमातून दर्जेदार शैक्षणिक सुविधा देऊ केलेली आहे. त्याचा लाभ या परिसरातील विद्यार्थी व पालकांनी घ्यावा असे आवाहन विलास इंदलकर यांनी केले. शिक्षक हा समाज माध्यमातील महत्त्वाचा घटक असून त्यांच्या माध्यमातून देशातील सर्व गुणसंपन्न युवा पिढी घडत असल्याचे त्यांनी सांगितले . क्रांतिवीर संकुल एक उपक्रमशील संकुल असून संस्थेने आपल्या सर्वोत्कृष्ट दर्जातून ते सिद्ध केल्याचेही विलास इंदलकर यांनी स्पष्ट केले. संस्थेवरील पालकाचा विश्वास तसेच शिक्षकांचे कष्ट महत्त्वाचे असल्यामुळेच क्रांतिवीर संकुलाचा नावलौकिक वाढल्याचे त्यांनी स्पष्ट केले. क्रांतिवीर शैक्षणिक संकुलाला उज्वल भविष्य असल्याचे सांगून कृषिरत्न विश्वंभर बाबर व आदर्श मुख्याध्यापिका सुलोचना बाबर यांच्या सामाजिक व शैक्षणिक गौरवशाली उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. पालक, शिक्षक व त्यांची जबाबदारी इत्यादी बाबत विलास इंदलकर यांनी मार्गदर्शन केले. संस्थेच्या सुयोग्य दर्जेदार, तसेच उपक्रमशील व्यवस्थापनाबद्दल समाधान व्यक्त केले.यूपीएससी, एमपीएससी याबरोबरचविविध संरक्षण सेवा तसेच भिन्न केंद्रीय स्पर्धा परीक्षा बाबत इंदलकर यांनी तपशीलवार मार्गदर्शन केले. स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी अभ्यासात सातत्य ठेवण्याबाबतही त्यांनी विद्यार्थ्यांना कानमंत्र दिला. यानिमित्ताने इंदलकर यांनी पालक विद्यार्थी यांच्याशी संवाद साधून मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थाध्यक्ष कृषिरत्न विश्वंभर बाबर यांनी केले तसेच प्रगतीचा अहवाल मान्यवरांना दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पल्लवी जगताप यांनी तर उपस्थितांचे आभार प्राचार्य विन्सेंट जॉन व्यक्त केले. Post navigation कोळा विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्य पदी उत्तम सरगर यांची निवड.. गोंदवले सोसायटीवर तीर्थक्षेत्र गोंदवले बुद्रुक विकास पॅनेलचा दणदणीत विजय