डॉक्टर सुरेश पांडुरंग रसाळे यांचा सेवापूर्ती गौरव समारंभ संपन्न.

(मुरुम प्रतिनिधी)

अनंतराव पवार महाविद्यालय, पिरंगुट, तालुका -मुळशी, जिल्हा- पुणे. येथे रसायनशास्त्र विभागाचे प्राध्यापक सन्माननीय डॉक्टर सुरेश पांडुरंग रसाळे यांचा सेवापूर्ती गौरव समारंभ आज संपन्न झाला. हडपसर, आकुर्डी, आदी ठिकाणी छत्तीस वर्षाची प्रदीर्घ सेवा केली.
सत्कार सोहळ्याच्या मंचावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर लोगो, निवृत्त प्राचार्या, रसाळे वहिनी उपस्थित होत्या.
ओतूरचे रहिवासी असलेले डॉक्टर रसाळे सर यांनी आपल्या शैक्षणिक प्रवासाचा पट उलगडताना अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून मी शिक्षण घेतलं. माझ्या घरासमोरच दारू विक्रीचे दुकान होते. तरीही माझ्या आईच्या संस्काराच्या शिदोरीमुळे मी यशस्वी झालो. दहावीला ५२टक्के गुण पडल्यामुळे अकरावी विज्ञानला प्रवेश पहिल्या दिवशी गेल्यावर कमी टक्केवारी असल्याने मिळत नाही असे सांगितले. परत दुसऱ्या दिवशी आग्रह केल्यावर कसातरी प्रवेश मिळाला. त्यानंतर बीएस.सी., एमएस. सी., पीएच.डी. होऊन मी यशस्वी प्राध्यापक झाल्याचे त्यांनी सांगितले.
डॉक्टर रसाळे सरांना शिकवलेले त्यांचे गुरु ,डॉक्टर रसाळे सरांचे विद्यार्थी, सहकारी मित्र अशा तीन पिढ्या समारोप कार्यक्रमामध्ये उपस्थित होत्या.
काल मी कोल्हापूरला कार्यक्रमासाठी गेल्यावर सरांनी आजच्या कार्यक्रमाचे निमंत्रण आठवणीने दिले.
मलाही या मंचावर मनोगत व्यक्त करण्याची संधी मिळाली… माझा मुलगा योगेश याला रसायनशास्त्र शास्त्र विषयात पीएच.डी. करण्यासंदर्भात मी पहिल्यांदा रामकृष्ण मोरे महाविद्यालयात ,आकुर्डी येथे त्यांना भेटलो. त्यावेळी सर रसायनशास्त्राचे विभाग प्रमुख होते. आमचे स्नेही प्राचार्य डॉक्टर राजेंद्र गुरव यांचा संदर्भ देऊन मी त्यांची भेट घेतल्यावर त्यांनी लगेच होकार देऊन दरम्यान पीएच.डी.साठी त्यांचे सहकारी डॉक्टर गाढवे सरांना मार्गदर्शक म्हणून देऊन अनमोल असे सहकार्य केले.
नोकरी लागली की माणसं चाकोरी सोडत नसतात. घर आणि गावाला परागंदा होतात. इकडचं तिकडचं पाहत नसतात पण सर मात्र याला अपवाद आहेत. सामाजिक कार्यक्रम, कौटुंबिक कार्यक्रम ,वेगवेगळे समारंभ यांना ते जातीने सक्रिय सहभागी होतात. अतिशय स्वागतशील, शांत, संयमी ,अहंकाराची बाधा न झालेले असं व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर रसाळे सर…
निवृत्तीनंतरच्या प्रवासासाठी आरोग्यदायी आणि आनंददायी शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाच्या वतीने डॉक्टर रसाळे सर आणि रसाळे वहिनी यांचा शाल ,मानपत्र ,पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
निवृत्तीनिमित्त डॉक्टर रसाळे सर यांना शाल, आहेर रसाळे वहिनी यांना महावस्त्र देऊन पाटील कुटुंबीयांच्या वतीने सन्मान केला.
रसाळे सरांच्या चिरंजीवाने नुकतेच सुरू केलेल्या हॉटेलमधील सुरुची भोजनाचा आस्वाद घेतल्यानंतर सरांचा निरोप घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *