म्हसवड (वार्ताहर): महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे एप्रिल २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, देवापूरने यंदा अत्यंत उल्लेखनीय यश मिळवले आहे. शाळेतील १२ हून अधिक विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले असून, शाळेने आपली गुणवत्तेची परंपरा पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.

अयोध्या आणि यज्ञेश शिष्यवृत्तीधारक या परीक्षेत कु. अयोध्या जयसिंग जाधव हिने ३०० पैकी २६० गुण, तर कु. यज्ञेश सागर देवदारे याने ३०० पैकी २४६ गुण मिळवून शिष्यवृत्तीधारक होण्याचा मान पटकावला. तसेच शिवम श्रीदत्त बाबर, अबोली रतन खाडे आणि वेदांत मदन बाबर यांनी २०० हून अधिक गुण मिळवून आपली उज्ज्वल पात्रता सिद्ध केली.

याशिवाय अद्विता निशांत बनसोडे, आराध्या रामेश्वर तेलंग, संस्कृती अमोल बनसोडे, स्वयम किशोर वाघमारे, समरजीत संजय बाबर, वीरेंद्र सचिन विरकर आणि तेजस पोपट बुधावले यांनी पात्र यादीत स्थान मिळवत घवघवीत यश संपादन केले.

गुणवत्तेची परंपरा कायम देवापूरच्या जिल्हा परिषद शाळेने गुणवत्तेचा सातत्यपूर्ण आलेख कायम राखत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे दाखवून दिले आहे. “विद्यार्थ्यांची मेहनत, पालकांचे मोलाचे सहकार्य आणि शिक्षकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शनामुळेच हे यश शक्य झाले,” असे मत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व मुख्याध्यापकांनी व्यक्त केले.

सर्व स्तरांतून कौतुक या यशस्वी विद्यार्थ्यांचे माणचे गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे, शिक्षण विस्तार अधिकारी विजय गंबरे, केंद्रप्रमुख किरण खोमणे, देवापूरचे ग्रामस्थ, सर्व पालक, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य, मुख्याध्यापक व शिक्षकवृंदाने मनःपूर्वक अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील शैक्षणिक प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *