नाझरे प्रतिनिधी


काशीच्या त्रिवेणी संगमावर महादेव मंदिर आहे तसे वाढेगांव ता. सांगोला येथे त्रिवेणी संगमावर शिवशंभू महादेवाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून एक निसर्ग रम्य ठिकाण निर्माण झाले व यासाठी वैजनाथ काका घोंगडे यांच्या प्रयत्नाला यश आले व त्यामुळे त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे व हे महादेवा सर्वांना चांगली सुबुद्धी दे, सुख शांती, समाधान दे व वाडेगाव नगरीला तुमचा आशीर्वाद राहू द्या अशी प्रार्थना करतो असे सद्गुरु मुक्तेश्वर शिवाचार्य वेळापूरकर महास्वामीजी यांनी प्रवचनात वाढेगाव येथे त्रिवेणी संगमावर शिव शंकराच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापणे प्रसंगी सांगितले.
सुरुवातीस महास्वामींची पाद्य पूजा संस्थापक चेअरमन दीपक बंदरे व सौ. अपर्णा बंदरे यांच्या शुभहस्ते करण्यात आली. तसेच मूर्ती स्थापने प्रसंगी अकरा विधीवंत दाम्पत्यांच्या हस्ते होम हवन, महाआरती करण्यात आली, यामध्ये सरपंच सौ. कोमल डोईफोडे व सुरेश डोईफोडे, उपसरपंच शिवाजी दिघे व सौ. स्नेहल दिघे, संगमेश्वर घोंगडे व सौ तेजश्री घोंगडे, महादेव दिघे सर व सौ शैलजा दिघे, सुभाष घोंगडे व सौ स्वाती घोंगडे, सचिन पवार व सौ श्वेता पवार, प्रशांत घोंगडे व सौ मनीषा घोंगडे, विक्रम लवटे व सौ आशा लवटे, गणेश बंदरे व सौ अस्मिता बंदरे, बापू माने व सौ मनीषा माने, रमेश शिंदे व सौ माया शिंदे इत्यादींचा समावेश होता. यावेळी आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख, शिवसेना नेते सागर दादा पाटील, जगदीश पाटील, शिक्षण सभापती चेतन सिंह केदार, जि प सदस्य अतुल पवार, माजी सभापती दत्तात्रय पाटील, उद्योजक गिरीश भाऊ नष्टे, माजी प्राचार्य डॉ. कृष्णा इंगोले, नारायण विसापूरे, बाळासाहेब वाघमारे, अरविंद डोंबे गुरुजी, संगीत शिक्षक भिंगे गुरुजी, पत्रकार रविराज शेटे, दशरथ बाबर, महिला, शिवभक्त, वाडेगाव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुरोहित म्हणून ओम स्वामी, रविराज स्वामी, महादेव स्वामी, विश्वंभर स्वामी यांनी काम पाहिले. शेवटी सर्वांना महाप्रसाद देण्यात आला.
__________________________

वैजनाथ धोंगडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *