मायणी प्रतिनिधी–— खटाव तालुक्यातील प्रतिष्ठित असलेल्या आनंद इंग्लिश स्कूल भगतसिंग प्राथमिक विद्यालय मायणी येथे इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या नवागतांचे स्वागत वाद्याच्या गजरात, पुष्पवृष्टी तसेच औक्षण करून स्वागत करण्यात आले यावेळी पंचायत समिती सदस्य सौ अनिता कोळी, प्रतिनिधी संभाजी कोळी, तसेच संस्थेची कार्याध्यक्ष राजाराम कचरे यांच्या हस्ते पुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी अनफळे, ढोकळवाडी, कान्हरवाडी, मायणी येथील ग्रामस्थ, पालक संस्थेची पदाधिकारी मुख्याध्यापक सुनील येलमर, दीपक खलीपे, तसेच शिक्षक, पालक ग्रामस्थ, मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी दीपक खलीपे यांनी आभार मानले Post navigation माणगंगा शैक्षणिक संकुलात नवीन शैक्षणिक वर्ष 2026-27 चा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा घिगेवाडी ता.कोरेगाव येथे जागतिक योग दिन उत्साहात संपन्न