पिंपोडे बुद्रुक/प्रतिनिधी/अभिजीत लेभे

गावातील शाळा व ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी आयोजित कार्यक्रमात विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थ तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सहभाग घेतला.

योग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थितांनी विविध योगासने व प्राणायामाचे प्रात्यक्षिक केले. यावेळी नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले राहते, तणाव कमी होतो आणि निरोगी जीवनशैली अंगीकारण्यास मदत होते, असे मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी दररोज योग करण्याचा संकल्प केला. या वेळी लोकनियुक्त सरपंच श्री नारायण सावंत माजी सरपंच श्री आदिनाथ सावंत व उपसरपंच-सदस्य-मदतनीस,आजी-माजी चेअरमन-व्हा,चेअरमन-संचालक,आजी-माजी सैनिक संघटना,अध्यक्ष-उपाध्यक्ष-सदस्य स्कूल व्यवस्थापन समिती मुख्याध्यापक-शिक्षिका-पालक-विद्यार्थी,राजमाता जिजाऊ महिला ग्राम बचत गट,कर्मवीर ग्रुप, अगस्त्या इंटरनॅशनल फाऊंडेशन, जाणता राजा गणेशोत्सव मंडळ,दुर्गा माता तरुण मंडळ,आशा सेविका, व
मोठ्या संख्येने नागरिकांच्या सहभागामुळे जागतिक योग दिनाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *