जावळीत सापडला चाळीस दिवस फरार चित्रपट निर्माता व दिग्दर्शक नुरानी…… मेढा दि: ajit jagtap.. निसर्गरम्य जावली तालुक्यामध्ये अनेकांनी जागा घेऊन फार्म हाऊस व बंगले बांधले आहेत. त्यामध्ये रेड्डी मुरा येथील एका फार्म हाऊसवर बलात्काराच्या गुन्ह्यात चाळीस दिवस मुंबईतून फरार असलेला आरोपी व चित्रपट निर्माता दिग्दर्शक शकील नुरानी यांना मुंबई पोलिसांनी शिताफीने अटक केली . चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक शकील नूरानी (७३ वर्षे) यांना ऑगस्ट २०२६ मध्ये एका ३३ वर्षीय अभिनेत्रीने केलेल्या बलात्कार, लैंगिक अत्याचार आणि ब्लॅकमेलिंगच्या आरोपावरून मुंबई पोलिसांनी सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील रेंडीमुरा या डोंगरावरील फार्महाऊसवरून अटक केली आहे.शकील नूरानी बॉलिवूडमधील एक जुने-जाणते चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक आहेत.त्यांनी ‘बडे दिलवाला’ (१९९९) आणि गोविंदाची मुख्य भूमिका असलेला ‘जोरू का गुलाम’ (२०००) यांसारख्या प्रसिद्ध हिंदी चित्रपटांची निर्मिती व दिग्दर्शन केले . मुंबईत एका ३३ वर्षीय अभिनेत्रीने २०१६ मधील एका घटनेबाबत तक्रार दाखल केली आहे. चित्रपटाच्या चर्चेच्या बहाण्याने घरी बोलावून नशयुक्त पेय देऊन अश्लील व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल केल्याचा आरोप करण्यात आला होता . गुन्हा दाखल झाल्यानंतर शकील नूरानी सुमारे चाळीस दिवस लपून राहिले होते. तांत्रिक तपासाच्या आधारे मुंबई पोलिसांच्या मालवणी पोलिसांनी त्यांना साताऱ्याजवळील जावळी तालुक्यातील रेंडीमुरा इथून चार दिवसांपूर्वी ८ ऑगस्ट २०२६ रोजी अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १२ ऑगस्ट २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.मुंबई पोलिसांनी निर्माता शकील नूरानी यांच्यावर भारतीय न्याय संहिताच्या कलम ६४ (बलात्कार), ७० (१) (सामूहिक बलात्कार), ३५१ (गुन्हेगारी धमकी) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलमांखाली गुन्हे दाखल केले आहेत. मालवणी पोलीस सध्या त्यांनी अभिनेत्रीला ब्लॅकमेल करण्यासाठी वापरलेला मोबाईल फोन आणि अश्लील व्हिडिओ शोधण्याचा प्रयत्न करत आहेतशकील नूरानी यांना बोरिवली येथील सुट्टीकालीन न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांना १२ ऑगस्ट २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ही कोठडी उद्या संपणार असून अद्यापही तपास बाकी आहे. Post navigation मुलाच्या लग्नाचे आमिष दाखवून वृद्ध दांपत्याची २५ लाखांची फसवणूक; अश्लील व्हिडिओची भीती दाखवून धमकावले कराडच्या प्रांताधिकाऱ्यांची बनावट सही व शिक्क्यांचा वापर; बोगस दस्त नोंदवून शासकीय जमीन लाटण्याचा प्रयत्न