म्हसवड, ता. माण : म्हसवड पोलिसांनी अवैध हातभट्टी दारू निर्मितीविरोधात मोठी कारवाई करत सुमारे १८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई शुक्रवार दि. २९ मे २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास माण तालुक्यातील घुबडेवाडी परिसरात करण्यात आली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, म्हसवड पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक १४४/२०२६ अन्वये महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (क)(ड)(इ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी जुबेरखान दोहेरखान पठाण (रा. पठाणवस्ती, चांदपुरी, ता. माळशिरस, जि. सोलापूर) याच्याविरोधात कारवाई करण्यात आली असून आरोपी सध्या फरार आहे. पोलिसांकडून त्याचा शोध सुरू असून त्यास नोटीस देण्याची तजवीज ठेवण्यात आली आहे.

पोलीसांनी धुळदेव येथील घोडे खुर नाला परिसरातील बाभळीच्या झाडाखाली सुरू असलेल्या हातभट्टी दारू निर्मितीच्या ठिकाणी छापा टाकला. यावेळी घटनास्थळावरून दारू तयार करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य व रसायन जप्त करण्यात आले.

जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये २०० लिटर क्षमतेचे चार लोखंडी बॅरलमध्ये सुमारे ८०० लिटर रसायन, १५ लिटरच्या पाच पत्यांमध्ये सुमारे ७५ लिटर रसायन, १८० मिलीच्या बाटल्यांमधील हातभट्टी दारू तसेच २० लिटर क्षमतेचा प्लास्टिक कॅन यांचा समावेश आहे. या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत अंदाजे १८ हजार ५०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ही कारवाई म्हसवड पोलिसांच्या पथकाने केली असून पुढील तपास पोलीस हवालदार बंडू शिंदे करीत आहेत. परिसरातील अवैध दारू व्यवसायावर पोलिसांकडून कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या:
“निर्भया पथकाला बालविवाह रोखण्यात यश; अल्पवयीन मुलीला मिळाले नवजीवन”    |    वडूजच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी; सहा महिन्यांत महत्त्वाची विकासकामे मार्गी – नगराध्यक्ष स्वप्नाली गोडसे    |    हिंगणी ग्रामपंचायत कार्यालयाला ग्रामस्थांनी ठोकले टाळे; ग्रामीण मार्ग क्र. १४४ च्या प्रश्नावरून संताप    |    आजचे राशीभविष्य.. 1 जून 2026..    |    म्हसवड येथील नगरवाचनालयात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती उत्साहात साजरी    |    म्हसवड पोलीसांचा दारु भट्टी वर छापा..    |    स्वच्छ बस स्थानक स्पर्धेत म्हसवड पुणे विभागात द्वितीय    |    आपली साथ आणि आशीर्वाद द्या- राजा माने    |    माणदेशी न्यूज - ताज्या घडामोडींसाठी वाचत रहा!