(अजित जगताप)

महाबळेश्वर दि: थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वर येथे एका जागरूक नागरिकांनी लेखी तक्रार केली होती. तक्रारीच्या अनुषंगाने महाबळेश्वर पोलीस ठाणे प्रवेशद्वारावर लावण्यात आलेला खाजगी कंपनीचा फलक काढण्याची कारवाई करून अर्ज निकाली काढला आहे. या बाबत आता उलट सुलट चर्चा सुरू झालेली आहे.
आपले सरकार पोर्टलवर ऑनलाईन तक्रार अर्ज दाखल केला होता. तक्रार अर्ज क्रमांक- DIS / HOMD / SATA/2026 / 61 अन्वये महाबळेश्वर पोलीस
ठाणे येथे तक्रारी अर्ज प्राप्त आहे.
सदर अर्जाची आम्ही स्वता चौकशी केलेली आहे. केलेले तक्रारी अनुशंगाने महाबळेश्वर पोलीस ठाणे जि. सातारा चे अधिकृत सरकारी फलकाचे उजवे बाजुस मॅप्रो चा लोगो ठळकपणे प्रदर्शीत
केलेला दिसुन येत आहे. अशी तक्रार केलेली असुन केलेले तक्रारी अनुशंगाने सदरचा फलक काढुन टाकण्यात आलेला आहे. व पोलीस स्टेशनचे इमारतीवर खाजगी बोर्ड लागणार नाहीत तसेच अशाप्रकारचे फलक लावण्यात येवु नये. असे सुचना दिलेल्या आहेत. तरी केलेला तक्रारी अर्ज निकाली काढत आहोत. असे समजपत्र संबंधित तक्रारदारास देऊन या प्रकरणावर महाबळेश्वर पोलीस ठाण्याने पडदा टाकण्याचे काम केले आहे.अशी चर्चा महाबळेश्वर मध्ये सुरू झालेली आहे.
वास्तविकरीत्या सरकारी जागेवर विनापरवानगी खाजगी जाहिरात (बॅनर, फ्लेक्स, होर्डिंग) लावल्यास महाराष्ट्र शासनाच्या नियमांनुसार कायदेशीर कारवाई केली जाते . अनधिकृत जाहिरात फलक किंवा बॅनर जप्त करून नष्ट केले जातात आणि काढण्याचा संपूर्ण खर्च संबंधित जाहिरातदाराकडून वसूल केला जातो.
अनधिकृत जाहिरात लावणाऱ्या जाहिरातदारावर, संबंधित मालकावर आणि प्रिंटरवर गुन्हे दाखल केले जातात. ‘महाराष्ट्र मालमत्ता विरूपणास प्रतिबंध अधिनियम, १९९५’ (Maharashtra Prevention of Defacement of Property Act, 1995) अंतर्गत गुन्हा सिद्ध झाल्यास ३ महिन्यांपर्यंत कारावास किंवा २,००० रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. अशी स्पष्ट तरतूद असताना महाबळेश्वर पोलीस ठाण्याने मॅप्रो अक्षर खोडून फक्त महाबळेश्वर पोलीस ठाणे असा फलक दर्शनी भागात पुन्हा लावला आहे. असे सुकृत दर्शनी दिसत आहे.
कायद्याची अंमलबजावणी तातडीने व्हावी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखावा यासाठी अनेक जण पोलिस ठाण्यात धाव घेतात. अनाधिकृत कोणतीही परवानगी न काढता महाबळेश्वर पोलीस ठाण्यात फलक लावल्या बाबत मॅप्रो कंपनीवर कोणती कारवाई झाली? याची माहिती तक्रारदार व जनतेला समजली पाहिजे. शेवटी ज्या उद्देशाने तक्रार केलेले आहे. ती सफल झाली असली तरी कोणाच्या सांगण्यावरून मॅप्रो कंपनीचा फलक लावला. याचा शोध घेऊन संबंधितांवर कारवाई व्हावी. अशी आता मागणी पुढे आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या:
“निर्भया पथकाला बालविवाह रोखण्यात यश; अल्पवयीन मुलीला मिळाले नवजीवन”    |    वडूजच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी; सहा महिन्यांत महत्त्वाची विकासकामे मार्गी – नगराध्यक्ष स्वप्नाली गोडसे    |    हिंगणी ग्रामपंचायत कार्यालयाला ग्रामस्थांनी ठोकले टाळे; ग्रामीण मार्ग क्र. १४४ च्या प्रश्नावरून संताप    |    आजचे राशीभविष्य.. 1 जून 2026..    |    म्हसवड येथील नगरवाचनालयात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती उत्साहात साजरी    |    म्हसवड पोलीसांचा दारु भट्टी वर छापा..    |    स्वच्छ बस स्थानक स्पर्धेत म्हसवड पुणे विभागात द्वितीय    |    आपली साथ आणि आशीर्वाद द्या- राजा माने    |    माणदेशी न्यूज - ताज्या घडामोडींसाठी वाचत रहा!