म्हसवड – (.प्रतिनिधी)केंद्रीय माध्यमिक बोर्ड म्हणजेच सीबीएसई इयत्ता 10 वी चा निकाल नुकताच जाहीर झाला असून म्हसवड येथील क्रांतिवीर इंग्लिश मिडीयम सीबीएसई स्कूल ने निकालाची उज्वल परंपरा कायम राखली असून समर्थ प्रमोद मंगरुळे याने 95.80 टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धा परीक्षेमध्ये अग्रभागी राहावेत या हेतूने कृषी विकास प्रतिष्ठान संचलित क्रांतिवीर इंग्लिश मिडीयम सीबीएसई स्कूल शिक्षण प्रणाली म्हसवड येथे सुरू केलेली आहेकेंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ सीबीएसई तर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, क्रांतिवीर इंग्लिश मिडीयम सीबीएसई स्कूल म्हसवडच्या विद्यार्थ्यांनी आपल्या अभूतपूर्व यशाने शाळेच्या नावलौकिकात भर घातली असूनशाळेने यशाची उज्वल परंपरा कायम राखली आहे . परीक्षेला बसलेल्या एकूण २३ विद्यार्थ्यांपैकी १७ विद्यार्थ्यांनी ७५% पेक्षा जास्त गुण मिळवून विशेष प्राविण्य मिळवले आहे. शाळेतील गुणवत्ताधारक विद्यार्थी व मिळवलेले गुण अनुक्रमे पुढील प्रमाणे समर्थ प्रमोद मंगरूळे – ९५.८० टक्के प्रथमश्रेया शेशाबा नरळे – ९५.६० द्वितीयश्रुती प्रवीण शिंदे – ९२.०० तृतीयआदित्य लिंबाजी वाणी – ८९.२०ओम विकास पवार –87 तेजल पांडुरंग काटकर: ८६.२०नंदिनी गणेश काटकर: ८५.६०राधिका विनोद पवार: ८५.४०कीर्ती सिद्धनाथ माने: ८३.८०अर्पिता अतिश भोरे: ८१.४०आर्यन रतन ढाले: ८०.८० विद्यार्थ्यांच्या या नेत्रदीपक यशाबद्दल क्रांतिवीर शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष, कृषिरत्न प्रा.विश्वंभर बाबर, संस्थेच्या सचिव तथा आदर्श मुख्याध्यापिका सुलोचना बाबर, उपाध्यक्ष अॅड. इंद्रजीत बाबर, सौ. हर्षदा बाबर आणि शाळेचे प्राचार्य विनसेंट जॉन , समन्वयक अभिजीत सावंत ,शिक्षक, पालक प्रतिनिधी आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. Post navigation ‘डॉ.रमणलाल दोशी’ व ‘कर्मवीर प्रेरणा’ या गौरव ग्रंथांवर चर्चा संपन्न पुसेगांव चा राजवीर अमोल जठार ठरला ‘म्हसवडचा भास्कराचार्य’