बार्शी: प्रतिनिधी
कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे समाजपरिवर्तन गौरव पुरस्कार प्राप्त डॉ. रमणलाल दोशी यांच्या जीवनकार्यावर आधारित माजी प्राचार्य डॉ. सुग्रीव गोरे लिखित डॉ. ‘रमणलाल दोशी’ व डॉ. राहुल पालके लिखित ‘कर्मवीर प्रेरणा’या गौरव ग्रंथावर औचित्यपूर्ण चर्चा करण्यात आली. या प्रसंगी या ग्रंथाच्या प्रती उपस्थितांना सप्रेम भेट देण्यात आल्या.कार्यक्रमास विजाणूशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. के. पी. देशमुख व सूक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख प्रा. डी. बी. माने हे मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत डॉ. रमणलाल दोशी यांच्या ध्येयधोरणांचा, कर्तृत्वाचा आणि दातृत्वाचा सखोल आढावा घेण्यात आला.
डॉ सुग्रीव गोरे म्हणाले, डॉ. रमणलाल दोशी यांनी वैद्यकीय व्यवसायाला केवळ उपजीविकेचे साधन न मानता समाजसेवेचे प्रभावी माध्यम म्हणून स्वीकारले. गरजू व वंचित रुग्णांना सेवा देताना त्यांनी सहानुभूती, संवेदनशीलता आणि माणुसकी यांचा उत्कृष्ट संगम साधला. प्रत्येक रुग्णाकडे एक व्यक्ती म्हणून पाहण्याची त्यांची दृष्टी त्यांच्या कार्यातून स्पष्टपणे दिसून येते. डॉ. राहुल पालके म्हणाले, ‘कर्मवीर प्रेरणा’ या प्रेरणादायी पुस्तकातही डॉ. रमणलाल दोशी यांच्या सामाजिक व आरोग्यविषयक कार्याचा उल्लेख आढळतो. कर्मवीर मामांच्या ध्येय-धोरणांतून साकारलेली मूल्ये—समाजसेवा, निःस्वार्थ वृत्ती आणि मानवतावाद—ही डॉ. दोशी यांच्या कार्यात प्रकर्षाने प्रतिबिंबित झालेली दिसतात. अशा ग्रंथामधून कृतज्ञतेचा भाव व्यक्त होतो आणि अशा साहित्यकृतींमुळे विद्यार्थ्यांना नवी दिशा व प्रेरणा मिळते असे सांगितले. उपस्थित मान्यवरांनीही या उपक्रमाचे कौतुक करत शैक्षणिक आणि सामाजिक मूल्यांचा प्रसार करण्यासाठी अशा साहित्यिक देवाणघेवाणीचे महत्त्व अधोरेखित केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या:
“निर्भया पथकाला बालविवाह रोखण्यात यश; अल्पवयीन मुलीला मिळाले नवजीवन”    |    वडूजच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी; सहा महिन्यांत महत्त्वाची विकासकामे मार्गी – नगराध्यक्ष स्वप्नाली गोडसे    |    हिंगणी ग्रामपंचायत कार्यालयाला ग्रामस्थांनी ठोकले टाळे; ग्रामीण मार्ग क्र. १४४ च्या प्रश्नावरून संताप    |    आजचे राशीभविष्य.. 1 जून 2026..    |    म्हसवड येथील नगरवाचनालयात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती उत्साहात साजरी    |    म्हसवड पोलीसांचा दारु भट्टी वर छापा..    |    स्वच्छ बस स्थानक स्पर्धेत म्हसवड पुणे विभागात द्वितीय    |    आपली साथ आणि आशीर्वाद द्या- राजा माने    |    माणदेशी न्यूज - ताज्या घडामोडींसाठी वाचत रहा!