म्हसवड प्रतिनिधी स्मित प्रोऍक्टिव्ह अकॅडमीचा बक्षीस वितरण सोहळा ; नऊ सायकलसह मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांचा गौरव मुलांमध्ये गणिताची गोडी निर्माण व्हावी आणि स्पर्धा परीक्षांच्या युगात त्यांचे भविष्य उज्ज्वल व्हावे, या उद्देशाने स्मित प्रोऍक्टिव्ह अकॅडमी, म्हसवड यांच्या वतीने आयोजित ‘मी होणार म्हसवडचा भास्कराचार्य’ या भव्य गणित स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात पार पडला. या स्पर्धेत विविध गटात हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांना सायकल व ट्रॉफी व मेडल, सर्टिफिकेट इतर बक्षिसे देण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून नगराध्यक्ष मा.सौ. पूजाताई विरकर ,सभापती मा. श्री. विक्रम शिंगाडे, मा. श्री. बालाजी जाधव, मा.श्री. क्षितिज सरतापे मा. श्री. रोहन सर , मा. श्री. अभय खांडेकर उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा. श्री. शरद ढगे, मा. श्री. अविनाश पाटील, मा. श्री. सागर भाकरे यांनी केले विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे कौतुक केले. यावेळी स्मित प्रोऍक्टिव्ह अकॅडमीचे संचालक शरद जाधव सर व संचालिका अनिता जाधव मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. स्पर्धेत विविध गटात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांना आकर्षक सायकली, ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.इयत्ता विजेत्याचे नाव गाव/ठिकाण१ ली राजवीर अमोल जठार (भास्कराचार्य) – पुसेगांव२ री अदिती अतुल शिंदे – पिलीव३ री रुणाली अभय खांडेकर – दहिवडी४ थी श्रीजा चेतन गलंडे – म्हसवड५ वी प्रांजली लक्ष्मण गोरड – दिवड६ वी समृद्धी सचिन मोरे – विरकरवाडी७ वी अनिकेत लाला कालेळ – जांभुळणी८ वी सार्थक सुहास गुजरे – पिलीव९ वी व १० वी सनवेद सचिन घोरपडे दहिवडी यावेळी पुणे येथे झालेल्या अबॅकस व वैदिक मॅथ्स नॅशनल कॉम्पिटिशन मध्ये अबॅकस स्पधेमधून इयत्ता ५ वी मधून वरद किरण काटकर याने देशात पहिला क्रमांक मिळविलेबद्दल त्याला सायकल व ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आलावैदिक मॅथ्स नॅशनल कॉम्पिटिशन मध्ये वैदिक मॅथ्स स्पधेमधून इयत्ता ६ वी मधून स्मित शरद जाधव याने देशात पहिला क्रमांक मिळविलेबद्दल त्याला सायकल व ट्रॉफी सन्मान करण्यात आला तसेच विजेत्या विध्यार्थ्यांना ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी अशा प्रकारच्या स्पर्धा अत्यंत महत्त्वाच्या असल्याचे मान्यवरांनी सांगितले. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक वृत्ती वाढते आणि त्यांना पुढील आयुष्यात यश मिळविण्यास मदत होते. कार्यक्रमास पालक, शिक्षक व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन स्मित प्रोऍक्टिव्ह अकॅडमीच्या टीमने केले. Post navigation साताऱ्यात सेनानेते व उपमुख्यमंत्र्यांनी हात जोडण्याचा बॅनर काढला… साताऱ्यात दिव्यांगांच्या प्रश्नांवर उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात आंदोलनाचा इशारा