.

फलटण/वैभव जगताप

पुणे -पंढरपुर हायवेवर काळज येथील कृष्णाई ढाब्या समोर चारचाकी गाडी क्र.एम एच ११ डि यु ९१२८ या गाडीने दुचाकी क्र. एम एच ११ सी एम ७२६८ या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने त्या दुचाकी वरील बाळासाहेब तुकाराम गाडवे देशमुख वय५५ व त्यांच्या पत्नी पुष्पा बाळासाहेब गाडवे देशमुख वय ५० हे दोघेही या धडकेमध्ये जागीच मृत्त पावले.


मिळालेल्या माहितीनुसार वृत्त पावलेल्या दांपत्य हे दोन चाकी वरून आपल्या घराकडे जात असताना त्यांच्या पाठीमागून आलेल्या चार चाकीने त्यांना जोरदार धडक दिली परंतु या चारचाकी वाहनाचीधडक एवढी तीव्र होती की हे दांपत्य २५ फुटापर्यंत उडून जागीच मृत्युमुखी पडले. प्रत्यक्षदर्शी व्यक्तीने सदर लोणंद पोलीस स्टेशनशी संपर्क करून पोलिसांना या घटनेची त्वरित माहिती दिली. घटनास्थळी लोणंद पोलीस स्टेशनचे बीट अंमलदार राहुल वाघ यांनी घटनास्थळी भेट देऊन पुढील कार्यवाही चालू केली. चार चाकी वाहनधारकाचे नाव आरोपी संभाजी जीनदास झिमल रा. गंगोती ता. माण जि. सातारा
येथील असून त्यास लोणंद पोलीसांनी ताब्यात घेऊन पुढील तपास करीत आहेत.या घटनेमुळे काळज व परिसरात शोककळा पसरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या:
“निर्भया पथकाला बालविवाह रोखण्यात यश; अल्पवयीन मुलीला मिळाले नवजीवन”    |    वडूजच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी; सहा महिन्यांत महत्त्वाची विकासकामे मार्गी – नगराध्यक्ष स्वप्नाली गोडसे    |    हिंगणी ग्रामपंचायत कार्यालयाला ग्रामस्थांनी ठोकले टाळे; ग्रामीण मार्ग क्र. १४४ च्या प्रश्नावरून संताप    |    आजचे राशीभविष्य.. 1 जून 2026..    |    म्हसवड येथील नगरवाचनालयात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती उत्साहात साजरी    |    म्हसवड पोलीसांचा दारु भट्टी वर छापा..    |    स्वच्छ बस स्थानक स्पर्धेत म्हसवड पुणे विभागात द्वितीय    |    आपली साथ आणि आशीर्वाद द्या- राजा माने    |    माणदेशी न्यूज - ताज्या घडामोडींसाठी वाचत रहा!