म्हसवड,ता.2 : प्रतिनिधी –

महामार्गाच्या ओढ्यावरील पुलाचे बांधकाम सुरु करताना वहातुकीस पर्यायी सुरक्षित रसत्याची सुविधा न केल्यामुळे गेली आठ वर्षापासुन वहानांच्या अपघाताचीट मालिकाच सुरु होऊन अनेकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या रोडवेज सोलुशन कंपनीच्या ठेकेदारावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी येथील पत्रकारांनी पोलिस ठाण्यासमोर आमोरण,उपोषणाचा इशारा देताच पोलिसांनी संबंधित ठेकेदारावर मनुष्य वधाचा म्हसवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

या बाबतची अधिक माहिती अशी की,आठ वर्षापुर्वी सातारा- पंढरपुर महामार्गाचे सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम सुरु करण्यात आले माण तालुक्यातील दिवड,व धुळदेव येथील ओढे व म्हसवड येथील माण नदीवरील पुलाची बांधकामे सुरु करण्यात आली परंतू या पुलांची बांधकामे गेली आठ वर्षापासुन संबधित ठेकेदारास मुदतीत पुर्ण करताच आली नाहीत याबरोबरच पर्यायी सुरक्षित रस्ते करण्यासही दुर्लक्ष केले गेले परिणामी वहातुकीस या पुलानजिकचे रस्ते खड्डेमय होऊन वहातुकीस धोकादायक झाले दिवड व धुळदेव येथील या रस्त्यावर अखंडीत अपघाताची मालिकाच सुरु झाली व अनेकांचे अपघातात नाहक बळी गेले व वहानांचीही मोडतोड होऊन संबंधित अपघातग्रस्त वाहनचालकांवर पोलिसांना गुन्हे दाखल करणे भाग पडले.म्हसवड येथील नागरिकांनी रस्ते सुरक्षित करुन पुलाची रेगाळलेली बांधकामे पुर्ण करावीत या मागणीसाठी वेळोवेळी आंदोलने व उपोषणेही केली,म्हसवड येथील यात्रा नियोजन च्या शासकिय अधिकारी यांच्या बैठकीतही रस्त्याची व पुलाची बांधकामे पुर्ण करणेबाबत नागरिकांनी संबंधित अधिका-यांना धारेवर धरण्याचे प्रकार घडूनही पाठपुराव्यास यश आले नाही.
दरम्यानच्या कालावधीत अपघाताची मालीका मात्र सुरुच राहिली. धुळदेव येथे नुकत्याच झालेल्या मोटरकार रस्त्यावरील खोल खड्ड्यात आपटून चार वेळा पलटी झाली या अपघातामध्ये सातारा ( कोडोली) सेवा निवृत सैनिकाच्या कुटुंबातील आजोबा आणि नातीचा बळी गेला व इकर तिघेजण गंभीर जखमी झाल्याची दुर्देवी घटना घडल्यानंतर अपघातस्थळी धुळदेव येथील ग्रामस्थांनी संबंधित ठेकेदाराविरोधात संताप व्यक्त केला या घटनेनंतर म्हसवड पोलीस ठाण्यात संबंधित ठेकेदारावर मनुष्य वधाचा रोडवेज सोलुशन कंपनीच्या ठेकेदार यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ता. 27 मार्च रोजी सकाळी धुळदेव येथे अपघात होऊन दोन जणांचा बळी गेला होता या गंभीर अपघात झाले नंतर जनतेत तीव्र पडसाद उमटले होते या मुळे म्हसवड येथील पत्रकार यांनी 1 एप्रिल रोजी उपोषण करणार असल्याचा निवेदनाद्वारे इशारा दिला दिला होता या उपोषणाची दखल घेऊन म्हसवड पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला.
फिर्यादीत असे नमुद केले आहे की अकस्मात मयत रजि. नं. 09/2026 भारतीय नागरीक सुरक्षा संहिता कलम 194 चे तपासात मयताचा खबरी जबाब,
साक्षीदार तपास, घटनास्थळ पंचनामा, इन्क्वेस्ट पंचनामा व इतर भौतीक पुराव्यावरुन ता.27/03/2026 रोजी सकाळी 08.30 वा चे सुमारास सचिन अशोक
निकम हे त्यांच्या नातेवाईकासह त्यांच्या ताब्यातील सुझुकी सिरेलो गाडी नंबर एमएच -06-BU-6221 ही सातारा बाजुकडुन पंढरपुर बाजुकडे घेवुन जात असताना मौजे
धुळदेव ता.माण गावचे हद्दीत म्हसवड ते पंढरपुर जाणारे हायवे रोडवेज सोल्युशन कंपनीचे ठेकेदार यांनी रस्त्याचे अपुर्ण थांबवलेले म्हसवड बाजुचे ठिकाणी
(पश्चिमेस)तसेच सदर रस्त्याचे पुर्वेस कॉक्रीटचे काम थांबवले ठिकाणी सुमारे 1 फुट खोल खाली खड्डे पडल्याने त्या ठिकाणी वाहनाचे अपघात होवुन त्यामध्ये जिवीत
हानी होवुन वाहनांचेही नुकसान होईल हे माहित असतानाही सदर रस्त्याचे काम करणारे कंपनीने त्यांना रस्त्याचे कामाची वर्क ऑर्डर देते वेळी रस्त्याचे काम
करतेवेळी एस.ओ.पी प्रमाणे कामाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे सुचना फलक तसेच दिशादर्शक बोर्ड किंवा रिप्लेक्टर लावलेले नसल्याने तसेच नमुद रस्त्याचे
कामाची वर्क ऑर्डर घेतले कंपनीने सदर ठिकाणी त्यांना दिले एस.ओ.पी प्रमाणे कार्यवाही केली नसल्याने सचिन अशोक निकम रा.कोडोली (ता.जि.सातारा) हे
चालवित असलेली त्याचे ताब्यातील सुझुकी सिलेरो गाडी नं.एम एच -06-बी यू -6221 ही म्हसवड बाजुने पंढरपुर बाजुकडे जात असताना म्हसवड बाजुकडील सिमेंट
रस्त्याचे काम थांबले ठिकाणचे कच्चा रस्ता सुरु झाले ठिकाणी खड्ड्यात आपटुन पलट्या होवुन त्यामध्ये अशोक विष्णु निकम (वय 76 रा.कोडोली (ता.जि.सातारा )
व कुमारी लक्ष्मी सचिन निकम (वय 13) रा.कोडोली (ता.जि.सातारा ) यांना गंभीर जखमी होवुन त्यामध्ये त्यांचा मृत्यु झालेला असुन वरद सचिन निकम, वैभवी सचिन
निकम, द्वारका सचिन निकम व पुनम सचिन निकम व गाडी चालक सचिन अशोक निकम यांना ही गंभीर व किरकोळ दुखापत झाली असुन गाडीचेही नुकसानीस
कारणीभुत झालेली असल्याने माझी रोडवेज सोल्युशन कंपनीचे ठेकेदार यांचे विरुध्द भारतीय न्याय संहिता कलम 105,125(a), 125(b), 324(4) प्रमाणे फिर्याद
आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे करत आहेत हा गुन्हा दाखल करण्यात आले नंतर प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे याचेसह येथील पत्रकार यांचे जनतेतून अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या:
“निर्भया पथकाला बालविवाह रोखण्यात यश; अल्पवयीन मुलीला मिळाले नवजीवन”    |    वडूजच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी; सहा महिन्यांत महत्त्वाची विकासकामे मार्गी – नगराध्यक्ष स्वप्नाली गोडसे    |    हिंगणी ग्रामपंचायत कार्यालयाला ग्रामस्थांनी ठोकले टाळे; ग्रामीण मार्ग क्र. १४४ च्या प्रश्नावरून संताप    |    आजचे राशीभविष्य.. 1 जून 2026..    |    म्हसवड येथील नगरवाचनालयात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती उत्साहात साजरी    |    म्हसवड पोलीसांचा दारु भट्टी वर छापा..    |    स्वच्छ बस स्थानक स्पर्धेत म्हसवड पुणे विभागात द्वितीय    |    आपली साथ आणि आशीर्वाद द्या- राजा माने    |    माणदेशी न्यूज - ताज्या घडामोडींसाठी वाचत रहा!