श्री सिद्धनाथ मंदिर भुयार महाशिवरात्रीनिमित्त दर्शनासाठी खुले राहणार


म्हसवड (वार्ताहर)

म्हसवड येथील प्राचीन शिवमंदिर भुयार महाशिवरात्रीनिमित्त दर्शनासाठी खुले करण्यात येणार आहे.
भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री सिद्धनाथ ट्रस्ट वतीने करण्यात आले आहे.

महाराष्ट्र आंध्र कर्नाटक राज्यातील अनेक भाविकांचे कुलदैवत असणाऱ्या म्हसवड येथील सिद्धनाथ मंदिरातील प्राचीन भुयार महाशिवरात्रीनिमित्त दर्शनासाठी खुले करण्यात येणार आहे .
वर्षातून फक्त एक दिवस महाशिवरात्रीच्या रात्री हे भुयार भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात येते
म्हसवड येथील प्राचीन श्री सिद्धनाथ मंदिराच्या प्रमुख गाभाऱ्याच्या खाली प्राचीन भुयार असून या भुयारामध्ये स्वयंभू शिवलिंग आहे .याची फक्त शिवरात्री दिवशी महापूजा केली जाते म्हसवड येथील मंदिराच्या पूजेच्या वेळी अभिषेकानंतर वरून पडलेले अभिषेक जल या शिवपिंडीवर जलधारा युक्त होऊन पडले जाते.
म्हसवड येथील सिद्धनाथ मंदिर हे नवव्या शतकामध्ये चालुक्य राजाच्या काळामध्ये बांधलेले आहे.
या मंदिराच्या रेखीव हेमाडपंथी बांधकामामुळे हे मंदिर पुरातन वास्तू शिल्प म्हणून ओळखले जाते.
शिवरात्रीच्या रात्री ९ वाजता श्री सिद्धनाथ आरती नंतर खुलं करण्यात येते. सकाळी पाच वाजेपर्यंत हे भुयार भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात येते..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या:
“निर्भया पथकाला बालविवाह रोखण्यात यश; अल्पवयीन मुलीला मिळाले नवजीवन”    |    वडूजच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी; सहा महिन्यांत महत्त्वाची विकासकामे मार्गी – नगराध्यक्ष स्वप्नाली गोडसे    |    हिंगणी ग्रामपंचायत कार्यालयाला ग्रामस्थांनी ठोकले टाळे; ग्रामीण मार्ग क्र. १४४ च्या प्रश्नावरून संताप    |    आजचे राशीभविष्य.. 1 जून 2026..    |    म्हसवड येथील नगरवाचनालयात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती उत्साहात साजरी    |    म्हसवड पोलीसांचा दारु भट्टी वर छापा..    |    स्वच्छ बस स्थानक स्पर्धेत म्हसवड पुणे विभागात द्वितीय    |    आपली साथ आणि आशीर्वाद द्या- राजा माने    |    माणदेशी न्यूज - ताज्या घडामोडींसाठी वाचत रहा!