पळशी येथील हभप गंबरे गुरुजी यांच्या घरातील गौरी सजावट.

पळशी वार्ताहर..
पळशी येथील हरिभक्त परायण नारायण गंबरे गुरुजी यांच्या घरातील गौरी सजावट पाहण्यासाठी भाविकांची वर्दळ असते.
गौरी गणपतीचा हा सण महाराष्ट्रातील अतिशय लोकप्रिय सांस्कृतिक सण आहे या सणा निमित्ताने महिलांमधील अनेक कलागुणांना मिळतो.
ग्रामीण भागात ही मोठ्या प्रमाणात हा उत्सव साजरा केला जातो.
माण तालुक्यातील पळशी या एका छोट्याशा गावामध्ये हरिभक्त परायण नारायण गंबरे गुरुजी यांच्या कुटुंबाने अतिशय सुंदर असे गणपती आणि गौरीची उत्कृष्ट सजावट केलेली होती. या सजावटीमध्ये त्यांनी पारंपरिक पद्धतीने आरास केलेली होती आणि यामुळे ही गणपती आणि गौरीची सजावट पाहण्यासाठी परिसरातील अनेक लोक भेट देण्यासाठी आलेले होते.
म्हसवड येथील जेष्ठ पत्रकार विजय टाकणे पाटील व म्हसवड येथील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गणेश रसाळ यांनी या गणपती आणि गौरीचै दर्शन घेतले.
यावेळी ही सजावट करण्यासाठी येईल गंबरे कुटुंबियांनी अतिशय सुंदर अशी सजावट केली त्यांच्या सोबतीला त्यांच्या दोन सुना व नाती यांनी सहकार्य केले .
गंबरे कुटुंब प्रत्येक सणाच्या निमित्ताने एकत्रितपणे सण व उत्सव साजरा करीत असतात. भारतीय संस्कृती रक्षणाचे कार्य हे कुटुंब करीत आहे.
पारंपरिक पद्धतीचे ही गौरी सजावट पाहण्यासाठी पळशी परिसरातील अनेक लोक नेहमीच येत असतात.
…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *