नाझरे येथे नाझरा फेस्टिवल नवरात्र मंडळातर्फे विविध स्पर्धेचे आयोजन..- दादासो हरिहर


नाझरे प्रतिनिधी
नाझरे ता. सांगोला येथे नाजरा फेस्टिवल नवरात्र मंडळातर्फे सोमवार दिनांक 12 ऑक्टोबर ते रविवार दिनांक 18 ऑक्टोबर अखेर विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याचे दादासो हरिहर यांनी सांगितले.
सोमवार दिनांक 12 ऑक्टोबर रोजी सायंकाळी चार वाजता महिला संगीत खुर्ची, मंगळवार दिनांक 13 ऑक्टोबर रोजी सायंकाळी चार वाजता होम मिनिस्टर खास महिलांसाठी, बुधवार दिनांक 14 ऑक्टोबर रोजी सायंकाळी चार वाजता दुष्काळामुळे जनावरांना चारा वाटप, गुरुवार दिनांक 15 ऑक्टोबर सायंकाळी आठ वाजता ओम मार्तंड भैरव वाघ्या मुरळी कार्यक्रम, शुक्रवार दिनांक 16 ऑक्टोबर रोजी सकाळी सहा वाजता महिला व युतीसाठी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन, शनिवार दिनांक 17 ऑक्टोबर रोजी सायंकाळी चार वाजता महिलांसाठी रांगोळी स्पर्धा व रविवार दिनांक 18 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजता स्टेज शो व सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे तरी सदर कार्यक्रमाचा लाभ दुर्गा माता भक्तांनी घ्यावा असे आवाहन नितीन टिंगरे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *