ताज्या बातम्या:
भाटकी गावातील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश मंत्री जयकुमार गोरे यांच्या विकासकामांवर विश्वास….भाटकी गावातील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश मंत्री जयकुमार गोरे यांच्या विकासकामांवर विश्वास

म्हसवड | प्रतिनिधी
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मान तालुक्यातील भाटकी गावात मोठा राजकीय बदल पाहायला मिळाला आहे. भाटकी गावातील अनेक युवक व ग्रामस्थांनी मंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वावर आणि विकासकामांवर विश्वास ठेवत त्यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.
जयकुमार गोरे यांनी भाटकी गावात राबवलेली विविध विकासकामे, माळरान भागात जिहे–कटापूर योजनेचे पाणी आणून भरलेले तलाव तसेच भविष्यातील विकासाचा स्पष्ट आराखडा पाहून या ग्रामस्थांनी भाजपची वाट धरल्याचे सांगण्यात आले. यामुळे मान तालुक्यातील पूर्व भागात भाजपची ताकद वाढली असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला हा मोठा धक्का मानला जात आहे.
आज भाजपमध्ये प्रवेश केलेले बहुसंख्य कार्यकर्ते यापूर्वी राष्ट्रवादी पक्षाशी संबंधित होते. मात्र मागील दहा ते पंधरा वर्षांत केवळ आश्वासनांपलीकडे ठोस विकास न झाल्याने ते नाराज होते. जयकुमार गोरे यांची काम करण्याची पद्धत, विकासाचा ‘स्ट्राइक रेट’ आणि प्रत्यक्षात दिसणारे परिणाम यामुळे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे मत अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.


भाजपमध्ये नव्याने दाखल झालेल्या कार्यकर्त्यांमध्ये
कालिदास शिर्के, शिवाजी पांडुरंग शिर्के, नवनाथ प्रभाकर शिर्के, गोरख प्रभाकर शिर्के, पैलवान लक्ष्मण अहिवळे, मधुकर रकटे, ब्रह्मदेव शिर्के, अजित तुकाराम शिर्के, प्रल्हाद शिर्के, रघुनाथ शिर्के, अमोल अहिवळे, सचिन दिलीप शिर्के, नानासो सावंत आदींचा समावेश आहे.
या सर्व नव्या कार्यकर्त्यांचे भाटकी गावातील भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांनी मनःपूर्वक स्वागत केले. आगामी निवडणुकांमध्ये नव्या उमेदीने आणि जोमाने काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या:
“निर्भया पथकाला बालविवाह रोखण्यात यश; अल्पवयीन मुलीला मिळाले नवजीवन”    |    वडूजच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी; सहा महिन्यांत महत्त्वाची विकासकामे मार्गी – नगराध्यक्ष स्वप्नाली गोडसे    |    हिंगणी ग्रामपंचायत कार्यालयाला ग्रामस्थांनी ठोकले टाळे; ग्रामीण मार्ग क्र. १४४ च्या प्रश्नावरून संताप    |    आजचे राशीभविष्य.. 1 जून 2026..    |    म्हसवड येथील नगरवाचनालयात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती उत्साहात साजरी    |    म्हसवड पोलीसांचा दारु भट्टी वर छापा..    |    स्वच्छ बस स्थानक स्पर्धेत म्हसवड पुणे विभागात द्वितीय    |    आपली साथ आणि आशीर्वाद द्या- राजा माने    |    माणदेशी न्यूज - ताज्या घडामोडींसाठी वाचत रहा!