माणदेशी कोहिनूर हिरे सचिन मोटे व नितीन वाघमोडे यांच्या उपस्थितीत ‘माणदेश रत्न’ सोहळा; धुळदेव यात्रेला चार चाँद!”

म्हसवड (प्रतिनिधी )—

माण तालुक्यातील धुळदेव येथे सुरू असलेल्या श्री धुळोबा देवाच्या यात्रेला यंदा विशेष महत्त्व प्राप्त झाले असून, ‘माणदेश रत्न पुरस्कार सोहळा’ हा या यात्रेचा मुख्य आकर्षण ठरत आहे. विशेष म्हणजे, माणदेशातील कोहिनूर हिरे म्हणून ओळखले जाणारे आयकर आयुक्त मा. सचिन मोटे आणि आयकर आयुक्त नितीन वाघमोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा भव्य सोहळा पार पडणार आहे.
२ ते ६ एप्रिलदरम्यान सुरू असलेल्या या यात्रेत भक्ती, परंपरा आणि संस्कृतीचा संगम पाहायला मिळत आहे. बैलगाडा शर्यत, भारुड, धनगरी ओवी, गजी नृत्य यांसारख्या पारंपारिक कार्यक्रमांमुळे धुळोबा बन सध्या उत्साहाने गजबजून गेले आहे.
यंदाच्या यात्रेत धुळदेव गावातील सुशिक्षित व जागरूक युवकांनी एकत्र येत ‘माणदेश रत्न’ या उपक्रमाच्या माध्यमातून एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. या अंतर्गत माण तालुक्यातील नवनियुक्त पोलीस उपनिरीक्षक अधिकारी, धुळदेव गावातील विविध शासकीय सेवेत कार्यरत अधिकारी तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
विशेष म्हणजे, या सोहळ्याला माणदेशी कोहिनूर हिरे सचिन मोटे व नितीन वाघमोडे यांची उपस्थिती लाभणार असल्याने कार्यक्रमाची प्रतिष्ठा अधिक उंचावली आहे. याशिवाय पोलीस उपअधीक्षक प्रदीप गोरड, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे तसेच प्रसिद्ध लेखक व कथाकथनकार नागू विरकर यांचीही प्रमुख उपस्थिती असणार आहे.
भक्ती आणि परंपरेसोबतच कर्तुत्वाचा सन्मान करणारा हा सोहळा माणदेशासाठी अभिमानास्पद ठरत असून, येणाऱ्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या:
अपहरण झालेल्या व्यक्तीने आरोपीला घेऊन सातारा जिल्हा परिषद सभागृहात दिली धडक    |    माण-खटाव वाचवा: भ्रष्टाचार व प्रशासनाच्या निष्काळजीपणाविरोधात सर्वांगीण विकासासाठी आमरण उपोषणाचा इशारा    |    सूरज दादा पाटील यांची जिल्हा परिषदेच्या दोन महत्त्वाच्या समित्यांवर निवड;मायणीत जल्लोष!    |    पुणे जिल्ह्यात शेतकरी सेनेचे संघटन वाढवणार- कृषिरत्न विश्वंभर बाबर    |    17 रोजी शिरताव येथे महा राजस्व अभियान    |    मायणी येथील हनुमंत चव्हाण यांचे निधन    |    शिरताव येथे 17 रोजी महाराजस्व अभियान, सर्व प्रकारचे दाखले मिळणार.    |    क्रांतिवीर सीबीएसई स्कूलचे घवघवीत यश ,समर्थ मंगरुळे प्रथम क्रमांक    |    माणदेशी न्यूज - ताज्या घडामोडींसाठी वाचत रहा!