ताज्या बातम्या: पाल्यावर अ वाजवी अपेक्षा लादू नका – सौ. सुलोचना बाबर. …पाल्यावर अ वाजवी अपेक्षा लादू नका – सौ. सुलोचना बाबर. .. म्हसवड..प्रतिनिधीआपल्या पाल्यांना कमी लेखू नका तसेच त्यांच्यावर अवाजवी अपेक्षेचं ओझं लादू नका असे आवाहन क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी प्राथमिक शाळा म्हसवडच्या मुख्याध्यापिका सुलोचना बाबर यांनी केले.क्रांतिवीर शैक्षणिक संकुल म्हसवड येथे पालक सभेचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष कृषिरत्न विश्वंभर बाबर तर प्रमुख मान्यवर म्हणून प्रा. हर्षवर्धन कुलकर्णी तसेच प्रणाली मगर, मुख्याध्यापिका पूनम जाधव, पालक प्रतिनिधी, शिक्षक इत्यादी मान्यवर उपस्थित होते.यावेळी बोलताना सुलोचना बाबर म्हणाल्या एका व्यक्तीच्या, एका हाताची पाच बोटे सारखी नसतात, मग सर्वच विद्यार्थी डॉक्टर,इंजिनिअर, अधिकारी कसे होणार ?. प्रत्येक विद्यार्थी व्यक्तिमत्वामध्ये भिन्न कौशल्य दडलेले असते. अधिकारी किंवा डॉक्टर न झालेले अनेक विद्यार्थी विविध व्यवसाय किंवा उद्योगधंद्यात तसेच क्रीडा क्षेत्रात यशस्वी झालेले आहेत. सर्व गुणसंपन्न विद्यार्थी घडवण्यासाठी आम्ही झटत असतो. पालकांची सुद्धा तेवढीच जबाबदारी असते. शाळेपेक्षा जास्त कालावधी विद्यार्थी घरी असतो. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन, प्रेरणा देणे गरजेचे आहे, तसेच सकारात्मक भूमिका जागवणे महत्त्वाचे असते. अभ्यासाबरोबरच खेळण्यासाठी सुद्धा विद्यार्थ्यांना मोकळीक गरजेचे असते. आपल्या पाल्याच्या जडणघडणीसाठी स्वतः पालकांनी टी. व्ही व मोबाईल पासून आवश्यक त्या प्रमाणात दूर राहिले पाहिजे. विद्यार्थी संगतीवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. आई वडील मोबाईलवर दंग झाल्याने पाल्या बरोबर संवाद कमी झाल्याचे सुलोचना बाबर यांनी सांगितले. ताज्या बातम्या: पाल्यावर अ वाजवी अपेक्षा लादू नका – सौ. सुलोचना बाबर. …पाल्यावर अ वाजवी अपेक्षा लादू नका – सौ. सुलोचना बाबर. .. पुढे बोलताना सौ. बाबर म्हणाल्या क्रांतिवीर शैक्षणिक संकुलाची प्रगती शिक्षकांचे कष्ट , विद्यार्थ्यांची जिद्द व चिकाटी तसेच पालकांच्या विश्वासामुळे झालेली आहे. संस्था सध्या रोप्य महोत्सवी वर्षात कार्यरत आहे. विद्यार्थी हितासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत तुमची ही साथ असू द्या असे भावनिक आवाहन सुलोचना बाबर यांनी केले. संस्थाध्यक्ष प्रा.विश्वंभर बाबर व प्रा. हर्षवर्धन कुलकर्णी यांनीही मनोगत व्यक्त केले. या निमित्ताने अनेक पालकांनी विविध सूचना मांडल्या. पालक सभेचे सूत्रसंचालन उपशिक्षिका पूनम कोकणी यांनी तर उपस्थितांचे आभार साधना दुधाळ यांनी व्यक्त केले. Post navigation राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेत सातारा संघास उवविजेतेपद.. भाटकी गावातील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेशमंत्री जयकुमार गोरे यांच्या विकासकामांवर विश्वास