झेन- Z यांना जोडत सत्यशोधक सभा संपन्न पुणे : शिवाजी मराठा हायस्कूल येथील खासे साहेब पवार सभागृहात शाक्त शिवराज्यभिषेक दिन आणि सत्यशोधक विचार वर्धापन दिनानिमित्त ‘चळवळीशी झेन Z ला’ कसे जोडता येईल? याविषयी परिसंवाद दि.27 .9.2026 रोजी दुपारी प्रबोधनात्मक संपन्न झाला. यावेळी विविध संस्था संघटनांचे प्रतिनिधी व कार्यकर्ते उपस्थित होते. या परिसंवादाचे अध्यक्ष डॉ दत्ताजी जाधव (सातारा ), प्रमुख वक्ते राजकुमार धुरगुडे पाटील, पत्रकार मुकुंद काकडे, माजी पोलीस अधिकारी सुरेश खोपडे, शिवाजी मराठा सोसायटी चे खजिनदार जगदीश जेधे, पानसरे कोण होता? या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी, अनिसचे पुणे कार्याध्यक्ष दत्तात्रय जाधव, संगीत सूर्य केशवराव भोसले सांस्कृतिक परिषद पुणेचे अध्यक्ष अजय पवार, ज्ञानेश्वर मोळक मा. मनपा आयुक्त इत्यादी मान्यवर उपस्थित होते.अनेक संस्था संघटनांचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी या परिसंवादात सहभाग घेतला. प्रा रघुनाथ ढोक, ऍड संदीप ताम्हणकर, दत्ता पाकिरे, माधवराव शिंदे, वैभव कवडे, भारत वडगावकर, सचिन सोनवळे, महेश बनकर.या कार्यक्रमाचे संयोजन मुकुंद काकडे, दत्तात्रय जाधव व अजय पवार यांनी केले होते. या कार्यक्रमात मोहिनी कारंडे यांच्या ‘शिवराय आणि संविधान’ पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. पानसरे कोण होता? या पुस्तकाचे मुखपृष्ठ पोस्टर मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले. सुरुवातीला प्राध्यापक बाबासाहेब जाधव यांनी पोवाडे म्हटले, आणि सांची चव्हाण हिने म. फुले यांचा आखंड म्हटला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सत्यशोधक प्राध्यापिका प्रतिमा परदेशी यांनी केले. आभार अजय पवार यांनी मानले. Post navigation ज्ञानदानापासून समाजकार्यापर्यंत निवृत्तीनंतरही अखंड ध्येय यज्ञ जोपासणारे केदार गुरुजी.. सुरेश ढोले सेवानिवृत्ती केंद्रीय मुख्याध्यापक संस्कारांची ७५ वर्षे आणि तुकोबांच्या विचारांचा महाजागर; सांगोला विद्यामंदिरमध्ये ऐतिहासिक महाग्रंथदान सोहळा संपन्न