ज्ञानदानापासून समाजकार्यापर्यंत निवृत्तीनंतरही अखंड ध्येय यज्ञ जोपासणारे केदार गुरुजी.. सुरेश ढोले सेवानिवृत्ती केंद्रीय मुख्याध्यापक सांगोला प्रतिनिधीअकोला ता. सांगोला येथील रहिवाशी सुप्रसिद्ध सेवानिवृत्त मुख्याध्यापक तानाजी तुकाराम केदार गुरुजी यांनी सांगोला तालुका पेन्शनर संघटना कार्यालय सांगोला येथे आपले आई-वडील कै. तुकाराम सोपान केदार गुरुजी व कै. सौ . कस्तुराबाई तुकाराम केदार शिक्षिका यांच्या स्मरणार्थ गोदरेज कंपनीचे अव्वल कपाट सप्रेम भेट दिले व त्यामुळे ज्ञानदानापासून समाजकार्यापर्यंत निवृत्तीनंतरही अखंड ध्येय यज्ञ जोपासणारे केदार गुरुजी आहेत व आईचा संस्कार आणि नैतिक मूल्याची शिदोरी आजही ते जोपासत आहेत असे मत सेवानिवृत्त केंद्र मुख्याध्यापक सुरेश ढोले गुरुजी यांनी संस्थेच्या कार्यालयात केदार गुरुजींच्या सत्कार प्रसंगी मत व्यक्त केले. अध्यक्षस्थानी संस्थेचे ज्येष्ठ संचालक सल्लागार शंकरराव सावंत हे होते.सदर प्रसंगी तानाजी केदार गुरुजी यांचा भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे सहसचिव दत्तात्रय खामकर, संचालक दिनकर घोडके, प्रगतशील शेतकरी तुकाराम नवले उपस्थित होते.__________________________केदार गुरुजी हे केवळ एक शिक्षक नसून एक चालते बोलते विद्यापीठ आहे. रयत शिक्षण संस्थेत पाच वर्षे सेवा केल्यानंतर आई-वडिलांच्या सेवेसाठी उच्च पगाराची नोकरी सोडून त्यांनी जिल्हा परिषदेत शिक्षक म्हणून सेवा रुजू केली. औताडे वाडी मंगळवेढा येथे मुख्याध्यापक असताना त्यांनी शाळेला चौथी व सातवी स्कॉलरशिप परीक्षेत राज्यात अव्वल स्थान मिळवून दिले, आज त्यांचे शेकडो विद्यार्थी प्रशासकीय सेवेत व औद्योगिक क्षेत्रात कार्यरत आहेत त्याचा आम्हास अभिमान आहे.मा. दिनकर घोडकेसंचालक सेवानिवृत्तपेन्शनर संघटना. Post navigation वैभव गणेश मंडळाची डीजेमुक्त, भक्तिमय विसर्जन मिरवणूक सांगोला विद्यामंदिरमध्ये उद्या संत विचारांचा महाजागरअमृतमहोत्सवी वर्षानिमित्त १० हजार विद्यार्थ्यांना तुकोबांची ‘अभंग पंचविशी’ व शिक्षकांना ‘गाथा’रूपी ज्ञानप्रसाद.