सांगोला विद्यामंदिरमध्ये ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा; विद्यार्थ्यांनी केला वाचनाचा संकल्प सांगोला (प्रतिनिधी) :सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला संचलित सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज, सांगोला येथे भारताचे माजी राष्ट्रपती, महान शास्त्रज्ञ आणि तरुणाईचे प्रेरणास्थान ‘भारतरत्न’ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिवसानिमित्त १५ ऑक्टोबर रोजी ‘वाचन प्रेरणा दिन’ अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजचे पर्यवेक्षक काकासो नरूटे यांच्या हस्ते डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस, तर उपमुख्याध्यापक प्रदीप धुकटे यांच्या हस्ते संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, थोर स्वातंत्र्यसेनानी कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या तैलचित्रास पुष्पहार अर्पण करण्यात आला.याप्रसंगी प्रा. धनाजी चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांनी तरुणाईला जी आभाळाला गवसणी घालण्याची ऊर्जा दिली, ती केवळ वाचनातूनच मिळू शकते असे सांगत आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईलची स्क्रीन क्षणिक करमणूक देऊ शकते, मात्र पुस्तके ही संकटात खंबीरपणे उभं राहण्याचं कायमस्वरूपी तत्त्वज्ञान देतात. “स्वप्न ती नसतात जी आपण झोपेत पाहतो, तर स्वप्न ती असतात जी आपल्याला झोपू देत नाहीत,” या डॉ. कलामांच्या सुप्रसिद्ध विचारांची आठवण करून देत सर्व विद्यार्थ्यांना अवांतर पुस्तके वाचण्याची सवय जोपासण्याचा आणि वाचनाचा हा यज्ञ अखंड तेवत ठेवण्याचा संकल्प करण्यास सांगितले. तसेच यावेळी विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी प्रत्यक्ष निर्माण व्हावी यासाठी विद्यार्थ्यांकडून वर्गात प्रत्यक्ष वाचन करून घेण्यात आले.या कार्यक्रमासाठी सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजचे उपमुख्याध्यापक प्रदीप धुकटे, उपप्राचार्य शिवशंकर तटाळे, पर्यवेक्षक काकासो नरूटे, शुभांगी घोंगडे, प्रशाला उत्सव विभाग प्रमुख नरेंद्र होनराव, ज्युनिअर कॉलेज उत्सव विभाग प्रमुख प्रा. धनाजी चव्हाण यांच्यासह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. Post navigation कायद्याच्या दस नंबरीने त्या बँकेच्या आठ संचालकांना लागले ग्रहण… ??? विद्यार्थ्यांच्या आर्थिक साक्षरतेसाठी पंढरपूर अर्बन बँकेचे अभियानकर्मयोगी विद्यानिकेतन येथे ‘स्वतःच्या सहीने बँक खाते’ उपक्रमाचा प्रारंभ