नाझरा फेस्टिवल तर्फे जनावरांना चारा वाटप कार्यक्रम कौतुकास्पद.. संचालक दादासो वाघमोडे


नाझरे प्रतिनिधी
‌ राज्यात सर्वत्र सध्या दुष्काळाची भीषण परिस्थिती असून, जनावरांना चारा व पाणी मिळणे अवघड झाले असून, यापुढे जनावरे जगवायची कशी असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला असताना, ना जरा फेस्टिवल नवरात्र महोत्सव तर्फे जनावराचा चारा वाटप करून कार्यक्रम केला व असे सामाजिक उपक्रम हे मंडळ गेली 14 वर्षे प्रयत्न करीत आहे त्यांना मदत करू व हा उपक्रम कौतुकास्पद आहे असे मानगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक दादासो वाघमोडे यांनी चारा वाटप प्रसंगी मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पत्रकार रविराज शेटे होते तर प्रमुख पाहुणे सरपंच डॉ विजय सरगर, युवा नेते मन्सूर तांबोळी, अमर तांबोळी, प्रा. मोहन भोसले, मा. उपसरपंच शिवाजी निंबाळकर, पांडुरंग वाघमारे, जयपाल गुरव, पिंटू अडसूळ उपस्थित होते.


राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या जनावरासाठी लवकरात लवकर व चाऱ्याचे नियोजन करावे म्हणजे दुष्काळात जनावरे जगतील नाहीतर पशुधन फारच कमी होणार आहे यासाठी काळजी घ्यावी व शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा असेही वाघमोडे यांनी सांगितले. सुरुवातीस मंडळाचे प्रमुख दादासाहेब हरिहर यांनी आमच्या मंडळातर्फे फुल नाही फुलाची पाकळी समजून शेतकऱ्यांना चारा देत आहोत व असे सामाजिक उपक्रम आपण दरवर्षी साजरे करतो त्यास सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन यावेळी केले. यावेळी शेतकरी बांधव, महिला, मंडळाचे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी सर्वांचे आभार नितीन टिंगरे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *