बातमी — वडजल प्रतिनिधी

वडजल ते झरे रस्त्यावरील कॅनॉल परिसरात आज दुपारी महिलेला दागिने हिसकावण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली. सौ. अंजना काटकर या शिवाजीनगरकडे आपल्या घरी जात असताना एका अनोळखी दुचाकीस्वाराने अचानक त्यांचे दागिने हिसकावण्याचा प्रयत्न केला.

यावेळी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी महिलेने जवळपास 15 फूट खोल रस्त्याच्या खाली उडी मारून प्रसंगावधान दाखवले. त्यांच्या आरडाओरड्यानंतर दुचाकीस्वार घटनास्थळावरून फरार झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळाची पाहणी केली असून आरोपीचा शोध सुरू करण्यात आला आहे. जखमी महिलेला पुढील उपचार आणि तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून परिसरातील CCTV फुटेजची पाहणी केली जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या:
“निर्भया पथकाला बालविवाह रोखण्यात यश; अल्पवयीन मुलीला मिळाले नवजीवन”    |    वडूजच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी; सहा महिन्यांत महत्त्वाची विकासकामे मार्गी – नगराध्यक्ष स्वप्नाली गोडसे    |    हिंगणी ग्रामपंचायत कार्यालयाला ग्रामस्थांनी ठोकले टाळे; ग्रामीण मार्ग क्र. १४४ च्या प्रश्नावरून संताप    |    आजचे राशीभविष्य.. 1 जून 2026..    |    म्हसवड येथील नगरवाचनालयात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती उत्साहात साजरी    |    म्हसवड पोलीसांचा दारु भट्टी वर छापा..    |    स्वच्छ बस स्थानक स्पर्धेत म्हसवड पुणे विभागात द्वितीय    |    आपली साथ आणि आशीर्वाद द्या- राजा माने    |    माणदेशी न्यूज - ताज्या घडामोडींसाठी वाचत रहा!