दहिवडी प्रतिनिधी: जयराम शिंदे
देशातील खेड्याची प्रवासी दळणवळण वाहतूक जीवनवाहिनी समजली जाणाऱ्या एस टी विभागाच्या
दहिवडी एस टी आगारातील सेवा शक्ती संघर्ष एस टी कर्मचारी संघाच्या अध्यक्ष पदी सचिन कोठावळे तर उपाध्यक्ष पदी दत्तात्रय शिंदे ,सचिवपदी महादेव शिंदे यांची एक मुखाने निवड करण्यात आली असून आमदार गोपीचंद पडळकर प्रणित असणाऱ्या या संघटनेत दहिवडी आगाराच्या नवीन कार्यकारिणी वेळी इतर ही पदाधिकारी निवडी या
सभासद सर्वानुमते जाहीर करण्यात आल्या आहेत या निवडीवेळी संघाचे सर्व सदस्य उपस्थित होते पोपोट पाटोळे अण्णा काळे दत्तात्रय शिंदे आप्पा खाडे बापू आत्राम कमलाकर वाघमोडे महादेव शिंदे लक्ष्मण काळेल एकनाथ ढोले दिलीप भोगले अनिल कुमार भांड ,संजय ओंबासे, भीमराव झिमल, संदीप काळे, अण्णा काळे ,प्रशांत तोरणे अमर माळवे विक्रम झिमल, दीपक ठोंबरे ,रोहिदास खाडे ,संदीप सावंत, श्रीकृष्ण राऊत ,महिला प्रतिनिधी जया बोधे ,सुवर्णा नाकाडे व इतर सदस्य उपस्थित होते या निवडीबद्दल मंत्री जयकुमार गोरे भाऊ राज्य संघटनेचे अध्यक्ष आमदार गोपीचंद पडळकर , शेतकऱ्यांचा आवाज सदाभाऊ खोत राज्याचे सरचिटणीस सतीश मेटकरी सातारा जिल्हा बँक उपाध्यक्ष अनिल भाऊ देसाई व इतर मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या
.
एस टी कामगारांचे प्रश्न , वेतन अडीअडचणी, संप, महिलांचे प्रश्न
यांना अग्रस्थानी स्थान देऊन सर्व प्रश्न वरिष्ठांचा मार्गदर्शनानुसार व सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे
अध्यक्ष सचिन कोठावळे
संघटनेच्या माध्यमातून सर्वांना बरोब घेऊन न्याय व अडीअडचणी प्राधान्य देऊन काम करणार आहे
सचिव महादेव शिंदे
फोटो ओळी संघांच्या निवडी वेळीं अध्यक्ष सचिन कोठावळे , दत्तात्रय शिंदे सचिव महादेव शिंदे व इतर सदस्य (जयराम शिंदे )
