पुण्यस्मरणा निमित्त ह.भ.प. सुखदेव महाराज ननवरे यांचे किर्तन ;

अहिल्यानगर ( प्रतिनिधि ): श्रीगोंदा तालुक्या मधील भिमाकाठ परिसरातील ऐतिहासिक पेडगांव किल्ले धर्मवीरगड (बहादुरगड) येथील रहिवाशी व राजेशिर्के घराण्यातील एक अष्टपैलू धाडसी व्यक्तिमत्व माजी चेअरमन तथा “भिमाकाठचा ढाण्या वाघ” पैलवान गणपतराव तुकाराम राजे शिर्के यांचे गेल्या वर्षभरापूर्वी २६ जानेवारी रोजी निधन झाले होते. त्यांचा ” प्रथम पुण्यस्मरण ” कार्यक्रम शुक्रवार दि. १६ जानेवारी रोजी आयोजन होणार असुन , त्यानिमित्त प्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प. सुखदेव महाराज ननवरे यांच्या किर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन राजेशिर्के घराण्याने केले आहे.

      कै. गणपतराव राजे शिर्के यांनी सन १९६५ ते १९७० च्या दशकात वयाच्या अवघ्या १८ ते २० व्या वर्षी कुस्ती क्षेत्रात मोठा नावलौकिक मिळवत, त्या दरम्यानच्या काळात श्रीगोंदा तालुक्यासह विशेषतः भिमाकाठ पट्टा परिसरातील लहाना थोरांच्या हृदयात जागा मिळवत. त्यावेळच्या तुलनेत सर्वात कमी वयात कुस्ती करता करता सामाजिक कार्याबरोबरच राजकारणात प्रवेश करुन भिमानदी काठाचा व किल्ले धर्मवीरगडासाठी (बहादुरगड) प्रसिद्ध असलेल्या ऐतिहासिक मौजे पेडगांवचा स्वच्छ पारदर्शी कारभार सांभाळणारे धडाडीचे घरंदाज व्यक्तिमत्त्व होते. ते चेअरमन तथा भाऊ नावाने सर्वांना परिचित असले तरी त्यांचे अलौकिक असे धाडस व समाजकार्य पाहता त्यांना "भिमाकाठचा ढाण्या वाघ" हीच उपाधी शोभून दिसत असल्याचे मत भीमा नदी पट्ट्यातील लोकांचे आहे. 

            चेअरमन राजेशिर्के यांनी त्यांच्या हयातीत ८० वर्षाच्या संघर्षमय जीवन काळात लाल मातीतल्या कुस्तीच्या आखाड्यात कधी पाठ न टेकवलेले नामवंत पैलवान म्हणून तर राजकीय निवडणुकांच्या मैदानातही कायम विजयाचा गुलाल घेणारे म्हणून त्यांना ओळखले जायचे, तालुक्याच्या राजकारणातही त्यांनी मान सन्मान मिळवत श्रीगोंदा तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक पद व शेतकऱ्यांची कामधेनु असलेल्या पेडगाव सोसायटीवर सलग तीस वर्ष चेअरमन पद भुषविलेले, आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत राजकारणात सक्रिय राहून संचालक पदावर विराजमान असलेले, गोर-गरिबांचे कैवारी, अन्याया विरोधात वाचा फोडणारे व्यक्तिमत्व होते. शृंगारपुरकर तथा सातारकर म्हणून ओळखले जाणारे श्रीमंत कै. तुकाराम राजे शिर्के यांचे ते पाच भावंडांपैकी धाकले सुपुत्र होते. ऐतिहासिक श्रीमंत पिलाजीराजे शिर्के घराण्याचे (महाराणी येसुबाईंचे ) वंशज असल्याने ते सर्वांचे प्रेरणास्थान ठरले होते. पैलवान कै. गणपतराव तुकाराम राजे शिर्के यांच्या कार्याचा कायम आदरयुक्त दबदबा होता. त्यांच्या जीवनावर रॉबिन हुड स्टोरी कादंबरी अथवा चित्रपट निघेल एवढं कार्य असल्याचे लोकांमधून बोलले जात असते. 

 आज मितिस पंजोबा हरिराजे शिर्के, आजोबा तुकारामजी राजे शिर्के, वडिल गणपतराव राजे शिर्के यांच्या मागे वंशपरंपरे प्रमाणे राजकीय, सामाजिक वारसा जपण्याचा प्रयत्न त्यांची मुले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश नेते तथा राष्ट्रवादी माजी सैनिक सेलचे प्रदेशाध्यक्ष दिपकराजे शिर्के, आं.स्वा.मराठा महासंघाचे प्रदेश संपर्क प्रमुख, गडदुर्ग संवर्धक, इतिहास अभ्यासक, पत्रकार लक्ष्मीकांत राजे शिर्के, सतिश राजे शिर्के यांच्यासह नातवंडे, पुतणे करताना दिसत आहेत. 
    "भिमाकाठच्या ढाण्या वाघास" अर्थात कै. पै. चेअरमन गणपतराव राजे शिर्के उर्फ भाऊंना भावपूर्ण आदरांजली..विनम्र अभिवादन..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या:
“निर्भया पथकाला बालविवाह रोखण्यात यश; अल्पवयीन मुलीला मिळाले नवजीवन”    |    वडूजच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी; सहा महिन्यांत महत्त्वाची विकासकामे मार्गी – नगराध्यक्ष स्वप्नाली गोडसे    |    हिंगणी ग्रामपंचायत कार्यालयाला ग्रामस्थांनी ठोकले टाळे; ग्रामीण मार्ग क्र. १४४ च्या प्रश्नावरून संताप    |    आजचे राशीभविष्य.. 1 जून 2026..    |    म्हसवड येथील नगरवाचनालयात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती उत्साहात साजरी    |    म्हसवड पोलीसांचा दारु भट्टी वर छापा..    |    स्वच्छ बस स्थानक स्पर्धेत म्हसवड पुणे विभागात द्वितीय    |    आपली साथ आणि आशीर्वाद द्या- राजा माने    |    माणदेशी न्यूज - ताज्या घडामोडींसाठी वाचत रहा!