प्रतिनिधी -विनोद लोहार
गुरुवार दि.९ ते. मंगळवार दि. १४ एप्रिल पर्यंत संपन्न होत आहे त्या निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .
यामध्ये गुरुवार दि. ९ रोजी.श्री भैरवनाथ देवाचा हळदी समारंभ , शुक्रवार दि. १० रोजी सायं. ६ ते ९ वा. श्री भैरवनाथ देवाचा लग्न समारंभ
सायं. ८ ते ९ चिंचेच्या मळ्यातील गोडसे यांचा रुखवत , रात्री दहा वाजता आबापुरीचा नामांकित गोंधळाचा कार्यक्रम,सायंकाळी स्वरनिनाद कला मंच कोरेगाव यांचा संगितमय कार्यक्रम होणार आहे . महावीर बळीराम जाधव , अमित व सचिन महावीर जाधव यांचे तर्फे महाप्रसाद तर शनिवार दि. ११ रोजी.
श्री भैरवनाथ देवाची घोड्यावरून मिरवणूक सोबत शरद म्युझिकल बॅन्ड , कराड , श्री महालक्ष्मी म्युझिकल बॅन्ड सातारारोड यांचा जुगलबंदीचा कार्यक्रम होणार आहे .
रविवार दि. १२ रोजी
श्री. जोगेश्वरी देवीची घोड्यावरून मिरवणूक सोबत अमर ब्रास बॅन्ड बारामती , नृसिंह सरस्वती बॅन्ड नृसिंहवाडी ता . शिरोळ यांचा जुगलबंदीचा कार्यक्रम , सोमवार दि , १३ रोजी श्रींचा छबिना श्री भैरवनाथ देवाची पालखीतून मिरवणूक पाच आऊट सलामी देऊन माधवनगर गजी मंडळ वडूज , बॅन्ड , सोनी फायर वर्क्स भाळवणी यांची फटाक्याची आतषबाजी व देखावा सादर करत पालखी निघेल. सायंकाळी ४ ते ६ शाहिर रामचंद्र भोसले यांचा माय्याक्का ओविकार मंडळाचा कार्यक्रम तर रामचंद्र कुंभार यांचेकडून दिपमाळ अर्पणचा कार्यक्रम होणार आहे .
मंगळवार दि. १४ रोजी.
दुपारी २.०० वा पासून
कुस्त्यांचा जंगी आखाडा
इनाम ५०० ते २,५१०००/- पर्यंत जोतिर्लिंग मंदीरासमोर (वडूज कराड रोड) होणार आहे .कुस्त्यांची जोडी लावण्यासाठी सकाळी १० ते १ वा. पर्यंत हुतात्मा स्मारक येथे नांव नोंदणी करावी. हिंदूराव नारायण गोडसे , युवराज गोडसे , नगरसेवक सुनिल गोडसे यांचे तर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे .
मंगळवार दि. १४ रोजी
सकाळी ९.०० वा. रात्रो. ९.०० वा. कमल अनिता कराडकर यांचा लोकनाट्य तमाशा तर दुपारी १ ते ४ वा. नाथाची खीर महाप्रसाद नाथसाहेब फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. महेश भिकूराव यांचेतर्फे तर गुरूवार दि. १६ रोजी
रात्रो. ९.०० वा. पुणेरी तडका हा कार्यक्रम होणार आहे.
तरी परिसरातील भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन भैरवनाथ यात्रा कमिटी व सर्व ग्रामस्थ वडूज यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या:
“निर्भया पथकाला बालविवाह रोखण्यात यश; अल्पवयीन मुलीला मिळाले नवजीवन”    |    वडूजच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी; सहा महिन्यांत महत्त्वाची विकासकामे मार्गी – नगराध्यक्ष स्वप्नाली गोडसे    |    हिंगणी ग्रामपंचायत कार्यालयाला ग्रामस्थांनी ठोकले टाळे; ग्रामीण मार्ग क्र. १४४ च्या प्रश्नावरून संताप    |    आजचे राशीभविष्य.. 1 जून 2026..    |    म्हसवड येथील नगरवाचनालयात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती उत्साहात साजरी    |    म्हसवड पोलीसांचा दारु भट्टी वर छापा..    |    स्वच्छ बस स्थानक स्पर्धेत म्हसवड पुणे विभागात द्वितीय    |    आपली साथ आणि आशीर्वाद द्या- राजा माने    |    माणदेशी न्यूज - ताज्या घडामोडींसाठी वाचत रहा!