फलटण – रक्षक रयतेचा महिला सामाजिक फाउंडेशनने मोफत आरोग्य शिबिरामध्ये नुसती तपासणी न करता महागडी मोफत औषधे देऊन एक चांगला प्रेरणादायी उपक्रम राबविला आहे. या उपक्रमाची सर्वांनी प्रेरणा घ्यावी अशी अपेक्षा श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव व माजी नगरसेवक डॉ.सचिन सूर्यवंशी बेडके यांनी केली.
रक्षक रयतेचा महिला सामाजिक फाउंडेशन फलटण यांच्यावतीने डॉ. बारकीज होमिओपॅथिक ईश्वरपूर {इस्लामपूर }यांच्या सहकार्याने कॅन्सर वेदना मुक्ती,चष्म्यापासून कायमची मुक्तता,जुनाट सर्दी,दमा, खोकला व सर्व प्रकारच्या फंगल इन्फेक्शन वर मोफत उपचार व मोफत औषधोपचार शिबिराचे आयोजन येथील नामदेवराव सूर्यवंशी बेडके महाविद्यालयात करण्यात आले होते. त्याप्रसंगी सचिन सूर्यवंशी बेडके बोलत होते या व्यासपीठावर आध्यात्मिक क्षेत्रातील परमपूज्य राजनकाका देशमुख महाराज, डॉक्टर उत्तम कुमार बारकी, चार्टर्ड अकाउंटंट मंजुषा धायगुडे, नगरसेवक पंकज पवार,डॉ अतुल दोशी,पत्रकार युवराज पवार,सामाजिक कार्यकर्ते मोहनराव पोतेकर आदी उपस्थित होते.
फलटण मधील रक्षक रयतेचा न्यूज पोर्टल व चॅनेल या माध्यमातून जनतेचे प्रश्न मांडत असतानाच रक्षक रयतेचा महिला सामाजिक फाउंडेशन च्या माध्यमातून नसीर शिकलगार यांनी विविध सामाजिक उपक्रम चालू केलेले आहेत. दर महिन्याला फलटण शहरातील महिलांसाठी वेगवेगळे कार्यक्रम होत असतानाच सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून एक आगळावेगळा आरोग्य शिबिराचा उपक्रम त्यांनी चांगल्या पद्धतीने राबविला आहे.
अनेक आरोग्य शिबिरामध्ये मोफत तपासणी केली जाते मात्र औषधे मोफत दिली जात नाही मात्र येथे कॅन्सर सारख्या दुर्घर आजावर तसेच डोळ्यांचे आजार,त्वचेचे आजार, सर्दी, खोकला,दमा यावर पंधरा दिवसाचे मोफत औषधे दिली जात असल्याने खऱ्या अर्थाने या उपक्रमाचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे.हा उपक्रम सर्वांनाच प्रेरणादायी असून याचे अनुसरण इतरांनी पण केले पाहिजे यासारखे आरोग्य शिबिरे आणखी फलटण तालुक्यात झाली पाहिजे त्यासाठी आपण निश्चितच सहकार्य करू अशी ग्वाही डॉ सचिन सूर्यवंशी बेडके यांनी दिली.
डॉ उत्तमकुमार बारकी यांच्या सारख्या नामांकित डॉक्टरांनी सामाजिक जनसेवेचा वसा घेऊन आपले कार्य सुरु ठेवले आहे. गोरगरीब रुग्णाचे ते आधारवड आहेत. त्यांच्या सारखे डॉक्टर देवदूत असून रुग्णांचे आव्हान स्वीकारायला त्यांना आवडते ही अतिशय चांगली गोष्ट आहे यामुळे चांगली वैद्यकीय सेवा ते देत आहेत असे गौरवोदगार डॉ सचिन सूर्यवंशी बेडके यांनी काढले.
परमपूज्य राजनकाका देशमुख महाराज यांनी रक्षक रयतेचा महिला सामाजिक फाउंडेशन मार्फत अत्यंत चांगल्या प्रकारे कामकाज सुरू असून निव्वळ सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे कार्य या माध्यमातून करण्यात येत आहे.गोरगरीब जनतेला हे शिबिर आधारवड असून रक्षक रयतेचा महिला फाउंडेशनच्या प्रत्येक उपक्रमास माझा आशीर्वाद असेल असे स्पष्ट केले.
डॉ. उत्तमकुमार बारकी यांनी आपल्या भाषणात होमिओपॅथिक उपचार हे अतिशय उपयुक्त असून या उपचाराकडे प्रत्येकाने विश्वासाने पाहिले पाहिजे अनेक दुर्घर आजार होमिओपॅथिक औषधाच्या माध्यमातून १००% बरे होऊ शकतात मी अनेक रुग्णांना बरे केले आहे फलटणमध्ये हे शिबिर अत्यंत चांगल्या प्रकारे पार पडत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
नगरसेवक पंकज पवार यांनी या आरोग्य शिबिराच्या आयोजनाबद्दल रक्षक महिला रक्षक रयतेचा महिला सामाजिक फाउंडेशनला धन्यवाद देऊन अशी शिबिरे वारंवार आयोजित करावे असे आवाहन केले.
स्वागत इम्तियाज तांबोळी यांनी केले.प्रास्ताविक सौ नंदा बोराटे यांनी तर आभार सौ मनीषा घडिया यांनी मानले. या आरोग्य शिबिरामध्ये 237 रुग्णांची तपासणी करून त्यांना मोफत औषधे देण्यात आली.
या शिबिरासाठी नामदेवराव सूर्यवंशी बेडके महाविद्यालय फलटण,डॉ अतुल दोशी,हॉटेल ब्रह्मा प्युअर व्हेज फलटण व सामाजिक कार्यकर्ते मोहनराव पोतेकर यांचे अनमोल सहकार्य लाभले.





